अजितदादांच्या अचानक जाण्याने खूप मोठा धक्का ; त्यांचे खूप उपकार सातारा जिल्ह्यावर खूप उपकार - श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी वाहिली श्रद्धांजली
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२९ जानेवारी २०२६ -तसेवा) - आजचा हा दुर्दैवी दिवस कधीच विसरला जाणार नाही अशी प्रतिक्रिया विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाबद्दल प्रतिक्रिया व्यक्त केली, यावेळी त्यांनी सांगितले की,विमानाला अपघात झाला असे समजले,परंतु सत्य उघडकीस आले तेव्हा दोन तीन तास काय व्यक्त व्हावे हे समजत नव्हते,1990 नंतर दादांची राजकारणात ओळख झाली होती,त्यांचे गुण कौशल्य चांगले होते, कोणत्याही गोष्टीची माहिती करून घेणे व सोडविण्याची त्यांची हातोटी होती,स्वभाव कडक,होता तेव्हडाच चांगला होता असे रामराजे यांनी सांगितले.
झटपट निर्णय घेणारे,स्पष्ट पणामुळे अनेकवेळा त्रास झाला,त्याची किंमतही त्यांना भोगावी लागली तरीही दादा दादाच होते,त्यांना राजकारणात लोकांनी गुणदोशासहित स्वीकारले होते, मी पाहिले त्यांनी इरिगेशनचे अनेक निर्णय चांगले घेतले होते,त्यांनी अर्थमंत्री म्हणून निर्णय घेत पश्चिम महाराष्ट्रातील अनेक प्रकल्प मार्गी लावले,त्यांच्याबरोबर राजकीय प्रवास केला,त्यांच्या आत लपलेला माणूस ही पहिला,दादांचा असा मृत्यू होणे दुर्दैवी आहे.
त्यांचे आपल्या सातारा जिल्ह्यावर प्रचंड उपकार झाले,1995 ते 1999 धाडस करून ठरवले होते काँग्रेस च तिकीट घ्यायचं,परंतु तेव्हा अजितदादा यांनी ठामपणे माझ्या सोबत उभे राहिले,त्यांचे उपकार राजकीय जीवनात विसरता येणार नाहीत,त्यांनी सातारा जिल्ह्यावर केलेले प्रेम,जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस फुटली तेव्हा माझी स्वतःची इच्छा होती की पवार साहेबांनी अजितदादांकडे नेतृत्व द्यावे,त्याचे कारण पश्चिम महाराष्ट्रात विकासकामे झाली पाहिजेत,आपण सत्तेत जावे,त्यांच्यात अनेक चांगले निर्णय घेण्याचे गुण दिसत होते,व म्हणून पवारसाहेब यांनी पुढच्या पिढीला नेतृत्व द्यावे असे वाटत होते.
सध्या राजकीय निर्णय वेगळे झाले असतील,परंतु या त्यांच्या अचानक जाण्याने राजकीय नुकसान कोणाचे होईल ते काळ ठरवेल, सुनेत्रा वाहिनी यांना या धक्क्यातून सावरण्याची ताकद परमेश्वराने द्यावी,तसेच पवार साहेब व कुटुंबाला हा मोठा धक्का बसला त्यातून सर्वांनी बाहेर पडावे या महाराष्ट्रासाठी , दादांनी केलेल्या विकासकामांमुळे त्यांचे उपकार हा सातारा जिल्हा कदापिही विसरू शकणार नाही असे रामराजेंनी सांगत जड अंतःकरणाने अजित दादा पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहिली.

No comments