Breaking News

विडणीच्या धर्तीवर धुळदेव, पिंपरद, माझेरी गावाचा विकास होणार - लोकनियुक्त सरपंच सागर अभंग

Following the model of Vidani, the villages of Dhuldev, Pimparad, and Majeri will be developed - Sarpanch Sagar Abhang

   फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ जानेवारी २०२६ - गेली पस्तीस वर्षे तुमच्याकडे सर्वच सत्ता होत्या, परंतु तुम्ही या जनतेला मूलभूत सुविधा देखीप उपलब्ध करून दिल्या नाहीत आता कोणत्या तोंडाने तुम्ही मते मागताय असा घणाघात विडणीचे लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी केला.

        धुळदेव कर्णे वस्ती येथे विडणी जिल्हा परिषद गटाच्या उमेदवार सौ.सुषमाताई अविनाश मोरे तसेच विडणी पंचायत समितीचे उमेदवार सचिन गजानन अभंग (अध्यक्ष) यांच्या प्रचारार्थ झालेल्या कोपरा सभेत, सागर अभंग बोलत होते. यावेळी धुळदेवचे माजी सरपंच माणिकराव अण्णा कर्णे,माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे,अविनाश मोरे,दत्तानाना ढमाळ,जालिंदर भिवरकर उपस्थित होते.

      आजपर्यंत सर्वसामान्य नागरिकांना विकासापासून वंचित ठेवले. विरोधकांनी फक्त गावागावात तसेच भावकी भावकीत भांडणे लावून, आपली राजकीय पोळी भाजली, तीस पस्तीस वर्षे मूलभूत सुविधा ही देऊ शकले नाहीत आता लोकांसमोर काय व्हिजन घेऊन जायचं या द्विधा मनस्थितीमध्ये असलेल्या विरोधकांचं आता राजकारण संपले आहे, आता विकास पुरुष असलेले माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व त्यांना साथ देणारे मंत्री जयकुमार गोरे,तसेच आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे फलटण शहरात सुरू असून तीच विकासकामे करायची असल्याने जिल्हा परिषदेच्या उमेदवार सौ.सुषमाताई मोरे व सचिन अभंग यांना निवडून द्या अन् त्यांच्या हाताला धरून तुमच्या गावात वाडी वस्तीवर विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी तयार रहा असे सागर अभंग यांनी स्पष्ट केले.

     तीस पस्तीस वर्षे सत्तेत असलेल्याना लोकांसमोर कोणत्या तोंडाने जायचे हे समजत नाही,विडणी येथे येऊन बघा, विकास काय असतो तो, माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व मंत्री जयकुमार गोरे यांच्या नेतृत्वाखाली आमचा उमेदवार सचिन अभंग अध्यक्ष 24×7 गावाच्या विकासासाठी उपलब्ध असतात,  विकासात सर्वात मोठा सहभाग त्यांचा असतो असा उमेदवार पंचायत समिती साठी दिला आहे.

       आपल्याला जुने लोक किंवा ज्येष्ठ मंडळी सांगतात की आजपर्यंत 200 मीटरचा रस्ता होत न्हवता, किंवा साधा बल्ब गेला तर दोन दोन महिने बसत न्हवता,आता तुम्ही तुमचं मुल्य दाखवून द्या,या दोन्ही उमेदवारांना धुळदेव मधून लीड द्या, मग तुमची सर्व कामे करायची माझी जबाबदारी आहे असे सागर अभंग यांनी सांगितले,आता निवडून आले की माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, मंत्री जयकुमार गोरे व आमदार सचिन पाटील मंत्रालयात जाऊन हे दोन्ही उमेदवार तुम्हाला यांच्या माध्यमातून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देतील,गेली तेरा चौदा वर्षे अध्यक्षानी कामे केली आहेत,धुळदेव, माझेरी अन् पिंपरद मधील सर्व बॅकलॉग भरून काढणार असा शब्द सागर अभंग यांनी दिला.  

या कोपरा सभेमध्ये प्रास्ताविक दिलीप शिंदे सर यांनी केले तर आभार चैतन्य कर्णे यांनी मानले, यावेळी धुळदेव, कर्णे वस्ती व 23 फाटा येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

  विडणीचा विकास केलाय तसा विकास इतर गणातील गावांचा करावा अशी मागणी माजी जिल्हा परिषद सदस्य महादेव पोकळे यांनी सांगितले.

   ही स्वाभिमानाची निवडणूक आहे, विरोधकांनी कोणत्याही प्रकारचा विकास केला नाही, ग्रामपंचायत,पंचायत समिती व जिल्हा परिषद सदस्य यांनी विकास करायचा असतो, कर्तबगार माणूस निवडून दिला की विडणी सारखं गाव होत,यांनी अकलूज चा खासदार निवडून दिला अन् ते गायब झाले, कुठंही ते फलटण तालुक्यात दिसत नाहीत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मंत्री जयकुमार गोरे अन् माजी  खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील आपल्याला विकासनिधी देतात,200 कोटी रुपयांचा निधी मिळणार आहे, तो पूर्ण निधी आपल्या ग्रामीण भागातील अनेक प्रश्न सोडविण्यासाठी होणार आहे - अविनाश मोरे 

मला भरघोस मतांनी निवडून द्या एका महिन्यात तुमची कामे केली नाहीत तर पुन्हा तुम्हाला तोंड दाखवणार नाही,मला निवडून दिले की पहिला गुलाल या ऐतिहासिक अशा धुळदेव मध्ये घ्यायला येणार - सचिन अभंग (अध्यक्ष)

No comments