Breaking News

नीरा उजव्या कालव्याचे पाणी ६ डिसेंबर रोजी सुटणार : आमदार सचिन पाटील

Water from Neera Right Canal will be released on December 6th: MLA Sachin Patil
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - नीरा उजवा कालवा पाणी सोडण्याबाबत फलटण पूर्व भागातील शेतकऱ्यांच्या मागील ८ दिवसांपासुन वारंवार आमदार सचिन पाटील यांच्याकडे येत होत्या. मागील काही दिवसांपासून नीरा उजवा कालव्याच्या अस्तरीकरणाचे काम सुरू असल्याने पाणी पुरवठा खंडित करण्यात आला होता. परंतु शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन आमदार सचिन पाटील यांनी नीरा उजवा कालव्याचे अभियंता श्री. मोरे साहेब यांच्याशी भ्रमणध्वनी मार्फत संपर्क करून तातडीने निरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा सुरू करणेत यावा आशा सूचना दिल्या. त्यानुसार निरा उजवा कालव्याचा पाणी पुरवठा उद्या दिनांक ०६.१२.२०२५ रोजी सोडण्यात येणार असल्याचे निरा उजववा कालव्याचे अभियंता श्री. मोरे यांनी मान्य केले आहे.

No comments