Breaking News

पंढरपूर ते घुमाण संत नामदेव महाराज रथयात्रा व सायकल वारीची उत्साहात सांगता

Pandharpur to Ghuman Sant Namdev Maharaj Rath Yatra and Cycle Wari conclude with enthusiasm

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.५ - संत शिरोमणी श्री नामदेव महाराज यांच्या जयंतीच्या निमित्ताने श्री क्षेत्र पंढरपूर ( महाराष्ट्र ) ते श्री क्षेत्र घुमाण ( पंजाब ) या सुमारे ५ हजार किलोमीटर लांब पल्याच्या व ३१ दिवस चालणाऱ्या देशातील पहिल्या अध्यात्मिक रथयात्रा व सायकल वारीची बुधवारी उत्साहात सांगता झाली.

    भागवत धर्म प्रसारक मंडळ, पालखी सोहळा पत्रकार संघ, श्री नामदेव दरबार कमिटी व समस्त नामदेव शिंपी समाजाच्या वतीने संत नामदेव महाराज यांची ७५५ वी जयंती , कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती श्री ज्ञानेश्वर महाराज यांचा ७२९ वा संजीवन समाधी सोहळा व शीख धर्माचे संस्थापक गुरुनानक देव यांच्या ५५६ व्या प्रकाश पर्वानिमित्त सालाबादप्रमाणे यंदा रविवार दि. २ नोव्हेंबर ते बुधवार दि. ३ डिसेंबर २०२५ दरम्यान ३१ दिवसांची भव्य रथयात्रा व सायकल वारी आयोजित करण्यात आली होती .  वारीचे हे चौथे वर्ष होते . या वारीने महाराष्ट्र, गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब, दिल्ली, उत्तर प्रदेश व मध्यप्रदेश या आठ राज्यातून प्रवास केला . या वारीत १०० सायकलस्वार व ५० भजनी मंडळी सहभागी झाली  होती . देशातील या  पहिल्या अध्यात्मिक सायकल वारीचे नेतृत्व  भागवत धर्म प्रसारक मंडळाचे अध्यक्ष सूर्यकांत भिसे यांनी केले होते.

No comments