छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्या व महिला व मुलींना मारणाऱ्यांवार पोस्को अंतर्गत कारवाई करण्याची मराठा क्रांती मोर्चा फलटण ची मागणी
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२३ - छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना व महिला व लहान मुलींवरील अमानुष मारहाणीबाबत एनपीडी व पॉक्सो कायद्यानुसार कठोर कारवाई करण्याबाबत निवेदन सखल मराठा सामाज व मराठा क्रांती मोर्चा फलटण च्या वतीने तहसीलदार डॉ.अभिजित जाधव यांना दिले.यावेळी मराठा बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
चिखला, तालुका लोणार, जि. बुलढाणा येथे दिनांक 17 फेब्रुवारी रोजी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याची जाणीवपूर्वक विटंबना करण्यात आली. ही घटना अत्यंत निषेधार्ह असून महाराष्ट्राच्या अस्मितेवर आघात करणारी आहे.
सदर घटना समजताच महिला भगिनी व नागरिक पुतळ्याचे रक्षण करण्यासाठी घटनास्थळी पोहोचले. मात्र काही समाजविघातक प्रवृत्तीच्या व्यक्तींनी महिला भगिनी तसेच निरपराध लहान मुलींवर अमानुष मारहाण केली. ही कृती मानवतेला काळिमा फासणारी असून कायद्याचा उघड अवमान आहे.
दरम्यान आमची ठाम मागणी आहे की, पुतळ्याची विटंबना करणाऱ्या सर्व आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कारवाई करण्यात यावी.महिला व लहान मुलींवर मारहाण करणाऱ्यांवर संबंधित गंभीर कलमांखाली गुन्हे दाखल करावेत.
अल्पवयीन मुलींवर झालेल्या मारहाणीच्या पार्श्वभूमीवर पोस्को कायदा अंतर्गत कारवाई करण्यात यावी.संबंधित आरोपींवर कठोर कायद्यांनुसार एनपीडी / इतर कलमे अंतर्गत गुन्हा दाखल करून न्यायालयीन प्रक्रिया तातडीने राबवावी अशी मागणी केली. घटनेची सखोल चौकशी करून मुख्य सूत्रधारांना समोर आणण्यात यावे व कडक कारवाई करण्याची मागणी राज्य सरकारकडे निवेदनाद्वारे केली यावेळी मराठा क्रांती मोर्चा, फलटण सर्व शिवप्रेमी संघटना यावेळी उपस्थित होते.

No comments