Breaking News

फलटण शहरात बुलेट रायडरवर पोलिसांचा कडक ‘ॲक्शन मोड’; कर्णकर्कश आवाजाला चाप

Police in strict 'action mode' on bullet riders in Phaltan city; Curbing the deafening noise

   Police in strict 'action mode' on bullet riders in Phaltan city; Curbing the deafening noise

फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि. २५ - फलटण शहरात बुलेट रायडरकडून होणाऱ्या कर्णकर्कश ‘फट-फट’ आवाजामुळे नागरिक त्रस्त झाले होते. गेल्या काही दिवसांत बिना नंबर प्लेटच्या दुचाकींच्या वाढत्या वावरामुळे चोऱ्यांच्या घटनांबाबत भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. मात्र आता पोलिस प्रशासन ॲक्शन मोडमध्ये आले असून अशा वाहनांवर थेट कारवाई सुरू करण्यात आली आहे.

   शहरात नियम धाब्यावर बसवून चालवण्यात येणाऱ्या बुलेट दुचाकी, सायलेंसरमध्ये फेरफार करून प्रचंड आवाज करणारी वाहने तसेच बिना नंबर प्लेटची वाहने पोलिसांनी जप्त करण्यास सुरुवात केली आहे. जप्त वाहनांची आरटीओमार्फत तपासणी करून आवश्यक ती कायदेशीर कार्यवाही केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. या कारवाईमुळे शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.

दबाव टाकणाऱ्यांना इशारा
कारवाईदरम्यान एका नगरसेवकाने पोलिस अधिकाऱ्यांना फोन करून बुलेट व बिना नंबर प्लेटची वाहने सोडण्याचा दबाव टाकल्याचा आरोप आहे.  ‘आता कारवाई करू नका’ असा फोन आल्यास, संबंधित व्यक्तीचे नाव व गैरप्रकार सर्व पत्रकार माध्यमांतून उघड करतील, असा इशारा देण्यात आला आहे. पोलिस प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, नियमभंग करणाऱ्यांवर कोणत्याही दबावाला बळी न पडता कठोर कारवाई केली जाईल. नागरिकांनीही अशा वाहनांबाबत तक्रारी नोंदवाव्यात, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.


No comments