शंकर मार्केट,फलटण येथे व्यापाऱ्यास जीवे मारण्याचा प्रयत्न ; दोघांना अटक
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२५ - दि.२२/०२/२०२६ रोजी फिर्यादी अनिल विठ्ठल हिरणवाळे, व्यवसाय गॅरेज, रा. ब्राम्हणगल्ली फलटण ता. फलटण जि. सातारा हे त्यांचे स्वतःचे गॅरेज बंद करून रात्री ९.३० वाजण्याच्या सुमारास गॅरेज समोर थांबले असताना, त्यावेळी रोडवर गोसावी वस्तीतील ७ ते ८ मुले त्यांचे ताब्यातील मोटार सायकलवरून फिर्यादीचे गॅरेजसमोरून मोटारसायकलचा मोठ्याने आवाज करून वेगाने चालवीत होते. गाडीचा धक्का इतर कोणाला लागू नये म्हणून मोटारसायकलवरील मुलांना एवढा आवाज करून, वेगात गाडया का चालविता, कोणाला तरी गाडी धडकेल असे सांगितल्याचा राग मनात धरून, अनिल हिरणवाळे यांना इसम नामे प्रशांत सुनिल जुवेकर याने, तु आम्हांला कोण सांगणार, थांब तुला दाखवितो असे म्हणून धमकी देऊन, पुढे निघून गेले. त्यांनतर १० मिनीटाने पुन्हा फिर्यादी उभ्या राहिलेल्या ठिकाणी आले व प्रशांत सुनिल जुवेकर हा म्हणाला की, तु आम्हाला शहाणपण शिकवतो का? असे म्हणून हातातील लोखंडी सतुराने फिर्यादीस जिवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारला तसेच अन्य ७ साथीदार यांनी हातातील लाकडी दांडक्याने व हातातील बिअरच्या बाटलीने मारहाण करून जखमी केले तसेच फिर्यादीचा चुलत भाऊ संतोष रखमाजी हिरणवाळे हे मदतीला आले, त्यावेळी त्यांनाही यातील इसम नामे प्रशांत जुवेकर याने, लोखंडी सतुराने डोक्यात मारहाण करून जखमी केले व त्याचे अन्य साथीदार यांनी लाकडी दांडक्याने, हाताने मारहाण करून गंभीर जखमी केल्याने, यातील जखमी अनिल विठ्ठल हिरणवाळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून फलटण शहर पोलीस ठाणेस गु.र.नं.५८/२०२६ भा.न्या. संहि. कलम १०९,११७ (२), ११८(१), ११५(२), १८९(२),१९१(२),१९१(३),१९० प्रमाणे दि.२३/०२/२०२६ रोजी गुन्हा दाखल झाला.
मारहाण करणाऱ्या संशयित इसमांपैकी १. संदीप विठ्ठल जाधव वय २० वर्षे, रा स्वामी समर्थ मंदिराजवळ मलटण ता. फलटण २. सुनिल ऊर्फ सतिश राजु मोरे वय २० वर्षे रा. कुंभारभट्टी, मलटण, ता. फलटण यांना पकडून त्यांना सदर गुन्हयात अटक करणेत आली असून दि.२४/०२/२०२६ रोजी मा. प्रथम वर्ग न्याय दंडाधिकारी, फलटण यांचे न्यायालयात हजर केले असता त्यांची दि.२६/०२/२०२६ रोजी पर्यंत पोलीस कस्टडी रिमांड मंजूर करणेत आली असून उर्वरित संशयितांचा शोध घेऊन पुढील कारवाई करीत आहोत. सदर गुन्हयाचा पुढील तपास श्री दिनेश शिंदे, पोलीस उपनिरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.

No comments