Breaking News

प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेला 'दीपस्तंभ' पुरस्कार

'Deepstambh' award to the Pradhan Urban Cooperative Credit Society

    फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्थेच्या उत्कृष्ट कामकाज, उत्तम व्यवस्थापण तसेच सामाजिक क्षेत्रातील योगदान, संस्थेच्या ठेवीत वाढ ,आदर्श कर्ज वाटप, आदर्श वसुली, शुन्य एन पी ए, सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन म्हनून दीपस्तंभ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार सहकार भारतीचे राष्ट्रीय अध्यक्ष उदय जोशी साहेब व महाराष्ट्र पतसंस्था फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते  संस्थेचे संचालक अभिजीत शिंदे , अतुल पवार व्यवस्थापक संदीप सस्ते  यांना प्रदान करण्यात आला.

    महाराष्ट्र राज्य सहकारी पतसंस्था फेडरेशन लिमिटेड मुंबई यांच्या वतीने दिला जाणारा दीपस्तंभ पुरस्कार सोहळा मुंबई येथे संपन्न झाला. 

    यावेळी बोलतांना उदय जोशी म्हणाले की, प्रारंभ नागरी सहकारी पतसंस्था संस्थापक जयकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली  चांगल्या पद्धतीने काम करीत आहे.  संस्थेच्या सभासद , ठेवीदार कर्जदार यांना अत्याधुनिक सुविधा उपलब्ध करून दिले जात आहेत. संस्थेच्या माध्यमातून सर्व सुविधा ऑनलाइन उपलब्ध आहेत. ही संस्था ग्राहकांचा विश्वास संपादन करेल असा विश्वास व्यक्त केला.

    यावेळी राज्य पतसंस्था फेडरेशनचे संचालक डॉ रविन्द्र भोसले, राज्य पतसंस्था फेडरेशनचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेखा लवांडे , पतसंस्था चे उपाध्यक्षा पुनम माने, संचालक,अँड वैशाली गाडे कल्याणी घोरपडे, आप्पा डुबल,शंकर कांबळे गुरूजी, यशवंत कारंडे, विकास सस्ते ,डॉ सुर्यकांत दोशी, शिवाजी कोकरे, गोरख जाधव, व्यवस्थापक संदीप सस्ते, सर्व  कर्मचारी उपस्थित होते.

No comments