टक्केवारीमुळे नगरपालिका दवाखान्याची लाईट तोडली - अनुप शहा यांचा गौप्यस्फोट
फलटण (गंधवार्ता वृतसेवा) दि.२७ - फलटण नगर परिषदेचा शंकर मार्केट येथे असणाऱ्या दवाखान्याचे वीज कनेक्शन, बिल न भरल्यामुळे तोडण्यात आले आहे ही बाब शरमेची असून, तातडीने या बाबीकडे लक्ष देण्यात यावे व विज बिल भरून तातडीने हा दवाखाना कार्यान्वित करावा अशी मागणी माजी नगरसेवक अनुप शहा यांनी केली आहे.
फलटण नगर परिषदेचा शंकर मार्केट येथील दवाखान्याची वीज जोडणी महाराष्ट्र राज्य वीज नियमक मंडळाच्या वतीने थकीत वीज बिलापोटी तोडण्यात आली आहे, विज बिल भरण्यासाठीच्या रकमेवर एका ज्येष्ठ नगरसेवकाने त्यामध्ये किती मलिदा मिळू शकतो अशी विचारणा केली असल्याने, त्यावर मिळणारी टक्केवारी दिली तरच हे बिल भरले जाईल अशी भूमिका घेतल्याने, वेळेत बिल भरणा करता आला नसल्याचा गौप्यस्फोट अनुप शहा यांनी केला.

No comments