Breaking News

आंबेडकरी चळवळीतील 'धगधगता अंगार' शिवसेनेच्या स्टार प्रचारक डॉ. ज्योती वाघमारे यांची फलटणमध्ये जाहीर सभा


Shiv Sena's star campaigner Dr. Jyoti Waghmare's public meeting in Phalta

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.६ - फलटण नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या (एकनाथ शिंदे गट) स्टार प्रचारक डॉ. ज्योती वाघमारे यांची जाहीर सभा 7 डिसेंबर 2025 रोजी बारामती चौक, फलटण येथे आयोजित करण्यात आली आहे. या सभेला शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, नगरसेवक पदाचे सर्व उमेदवार आणि मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित राहणार आहेत.

    झोपडपट्टीतून थेट राज्याच्या राजकारणात मोठे स्थान मिळवणाऱ्या डॉ. वाघमारे यांचा प्रवास प्रेरणादायी ठरलाय. मागासवर्गीय कुटुंबात जन्म, तेलुगू मातृभाषेचे संस्कार आणि दारिद्र्याच्या कठोर परिस्थितीवर मात करत त्यांनी शिक्षण आणि समाजकारणाच्या जोरावर स्वतःची दमदार ओळख निर्माण केली.

    सोलापूरच्या झोपडपट्टीतून सुरुवात करत त्यांनी महिलांवर, दलितांवर आणि वंचित घटकांवर होणाऱ्या अन्यायाविरुद्ध आक्रमक भूमिका घेत सक्रिय चळवळ उभी केली. आंबेडकरी चळवळीतील ‘धगधगता अंगार’ म्हणून त्या राज्यभर ओळखल्या जाऊ लागल्या. विद्रोही साहित्य संमेलनाचे यशस्वी आयोजन करून त्यांनी विद्रोही साहित्य जनमानसात पोहोचवण्याचे मोठे कार्य केले.

    यानंतर एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी शिवसेनेत (शिंदे गट) प्रवेश केला. त्यांच्या निष्ठा आणि आक्रमक कार्यशैलीमुळे त्यांना थोड्याच काळात ‘प्रदेश प्रवक्ता’ म्हणून जबाबदारी देण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ‘लाडक्या बहिण’ म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली असून राज्यभरातील लोकसभा, विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य निवडणुकांत त्या पक्षाच्या 'स्टार प्रचारक' म्हणून सक्रिय आहेत.

    फलटणमधील ही सभा शिवसेनेच्या प्रचाराला नवी ऊर्जा देणार असून मोठ्या प्रमाणात नागरिकांचा सहभाग अपेक्षित आहे.

No comments