वकिली शिक्षणातून समाजसेवा घडली पाहिजे – ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.३ - फलटण वकिलीचे शिक्षण घेतल्यानंतर ते समाजकार्यासाठी वापरले गेले पाहिजे, वकिलीच्या माध्यमातून समाजातील अन्याय, दहशत, भीती यांना पूर्णविराम मिळायला हवा, असे प्रतिपादन शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार ॲड. श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांनी केले.
३ डिसेंबर ‘ॲडव्होकेट डे’ निमित्त फलटण शहरातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यास वंदन करून कार्यक्रम साजरा करण्यात आला. यावेळी प्रभाग क्रमांक २ मधील नगरसेवक पदाचे उमेदवार ॲड. अनिकेत अहिवळे, ॲड. श्याम अहिवळे, जयकुमार रणदिवे, शक्ती भोसले, सामाजिक कार्यकर्ते पांडुरंग अहिवळे, दलित पॅंथरचे रोहित अहिवळे, विकी काकडे, प्रशांत अहिवळे, प्रफुल अहिवळे यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमादरम्यान ॲड. अनिकेत अहिवळे म्हणाले की, “हिंसा व दहशत मिटवणे हे वकिलांचे प्रमुख कार्य आहे. समाजात न्याय, सुरक्षितता आणि समानता टिकवण्याची जबाबदारी प्रत्येक वकिलाने स्वीकारली पाहिजे.”

No comments