कुरेशीनगर, मंगळवार पेठ येथील कुरेशी बांधवांचा भाजपात प्रवेश
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.३ - माजी खासदारांची हे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक तीन मध्ये कुरेशी नगर मंगळवार पेठ फलटण येथील कुरेशी बांधवांनी भाजपात प्रवेश केल्यामुळे मंगळवार पेठेत भाजपाची ताकद वाढली आहे.
बिलाल मन्सूर कुरेशी, सलमान हरून कुरेशी, अक्रम अल्ताफ कुरेशी, शहानुर नूरमोहम्मद कुरेशी, सद्दाम जाकीर कुरेशी, सय्यद आदम कुरेशी, आफताब अफजल कुरेशी, शहनवाज अफजल कुरेशी यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. यावेळी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सागर सोरटे उपस्थित होते.

No comments