उद्यानविद्या महाविद्यालय व कृषि महाविद्यालय, फलटणच्या खेळाडू विद्यार्थ्यांची राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेसाठी निवड
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालय व कृषी महाविद्यालय, फलटण येथील खेळाडू विद्यार्थ्यांची स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड येथे होणाऱ्या राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेसाठी विद्यापीठीय संघामध्ये निवड झाली आहे. अश्वमेध स्पर्धेसाठी विद्यापीठीय स्तरीय खेळाडू विद्यार्थ्यांमध्ये कुमार अथर्व ननावरे, कुमार प्रमोद खरात, कुमार चैतन्य बोडरे, कुमार दयासागर पाटील, कुमार राहुल पावरा आणि विद्यार्थिनींमध्ये कुमारी सेजल साळवी, कुमारी पायल आढाव, कुमारी साक्षी नाझीरकर, कुमारी पूजा बनकर, कुमारी मृण्मयी हिंगणे यांनी विद्यापीठिय संघामध्ये स्थान मिळवून दोन्ही महाविद्यालयांचा नावलौकिक वाढवण्यात आलेला आहे तसेच श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे क्रीडा अधिकारी प्रा. रोशन सोडमिसे यांची महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी विद्यापीठ स्तरीय ॲथलेटिक्स संघाचे संघ व्यवस्थापक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंना दोन्ही महाविद्यालयाचे प्राचार्य व क्रीडा विभागाचे प्रा. रोशन सोडमिसे व प्रा. एन. एस. खुरंगे यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. राज्यस्तरीय अश्वमेध स्पर्धेसाठी विद्यापीठीय संघामध्ये निवड झाल्याबद्दल फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष व महाराष्ट्र राज्य विधान परिषदेचे माजी सभापती मा. ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे सेक्रेटरी तथा माजी अध्यक्ष, जिल्हा परिषद, सातारचे मा. श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, फलटण कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन मा. श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, फलटण एज्युकेशन सोसायटीचे मे. गव्हर्निंग कौन्सिलचे सभासद सदस्य, फलटण एज्युकेशन सोसायटीचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम, श्रीमंत शिवाजीराजे उद्यानविद्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस. डी. निंबाळकर, कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यू. डी. चव्हाण यांनी खेळाडू विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

No comments