फलटण शहराच्या आकाशात रहस्यमय प्रकाशरेषा; नागरिकांमध्ये चर्चेला उधाण
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.३ - 1 डिसेंबर 2025 रोजी रात्री एक अनोखा प्रकार पाहायला मिळाला. शहराच्या आकाशात एकापाठोपाठ रेषेत मांडलेली चमकदार लाईट्सची मालिका दिसल्याने नागरिक काही काळ आश्चर्यचकित झाले. ही प्रकाशरेषा काही मिनिटे दिसून हळूहळू अदृश्य झाली. अचानक दिसलेल्या या घटनेमुळे सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडिओंचा पाऊस पडत असून, “नेमकं हे काय?” या प्रश्नावर चर्चा रंगली आहे.
तज्ज्ञांच्या माहितीनुसार, ही घटना स्पेसेक्स च्या स्टारलिंक उपग्रह रेषेमुळे असण्याची शक्यता अत्यंत जास्त आहे. नव्याने प्रक्षेपित केलेले उपग्रह सुरुवातीच्या कक्षेत सरळ ओळीत असतात आणि सूर्यप्रकाश परावर्तित झाल्याने आकाशात लाईट्सची मालिका दिसते. जगभरात असे दृश्य अनेकदा दिसते आणि अनेकांनी सुरुवातीला त्याला यूएफो समजण्याचीही चूक केली आहे.

No comments