Breaking News

विडणी येथे उभारले लोकसहभागातून सायकल व जॉगिंग ट्रॅक ; विडणी गाव देशात मॉडेल म्हणून नक्कीच पुढे येईल - सरपंच सागर अभंग

Bicycle and jogging tracks built in Vidni with public participation, Vidni village will definitely come forward as a model in the country - Sarpanch Sagar Abhang

      फलटण गंधवार्ता वृत्तसेवा दि.३ - लोकसहभागातून गावचा विकास म्हणजे गावकऱ्यांच्या सहभागातून गावाच्या सर्वांगीण विकासासाठी काम करणे होय, याच धर्तीवर विडणी ता.फलटण येथे 100 टक्के लोकवर्गणीतुन तब्बल तीन किलोमीटरचा जॉगिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक चे प्रत्यक्षात काम चालू झाले, सदर जॉगिंग ट्रॅक सोबतच गावच्या विकासाचा ट्रॅक देखील असाच वाढत राहील असा ठाम विश्वास लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांनी व्यक्त केला आहे.

    माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर,आमदार सचिन पाटील आणि ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या माध्यमातून आजपर्यंत बरीच विकासाची कामे ग्रामपंचायत विडणी याठिकाणी झालेली आहेत, त्यातीलच हे एक काम गावातील जेष्ठ नागरिक त्याचबरोबर गावातील युवक यांच्या शारीरिक फिटनेस मध्ये भर घालण्यासाठी आज विडणी मधे तब्बल ३ की.मी.लांबीचा जॉगिंग ट्रॅक व सायकलिंग ट्रॅक चे प्रत्यक्षात काम चालू झाले.

    गावाच्या गरजा, समस्या ओळखून शाश्वत विकासासाठी नियोजन करणे, ग्रामसभा आणि ग्रामपंचायतीच्या माध्यमातून निर्णय घेणे, स्थानिक संसाधनांचा योग्य वापर करणे, तसेच श्रमदान आणि इतर प्रकारे सहभाग नोंदवणे यांचा समावेश वाढत असून, आपल गाव समृद्ध गाव बनविण्यासाठी ज्येष्ठ नागरिक तसेच युवक व लाडक्या बहिणी नेहमीच लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांना तण मन धनाने साथ देत असल्याचे सागर अभंग यांनी स्पष्ट केले.

    सर्वांगीण विकास हाच ध्यास मनाशी बाळगून केवळ भौतिक सुविधांपुरतेच नव्हे, तर मानसिक, सामाजिक आणि सांस्कृतिक उन्नतीसाठी देखील लोकसहभाग महत्त्वाचा आहे.याचे उत्तम उदाहरण म्हणजे विडणी गाव तसेच तेथील सर्वच ग्रामस्थ होय, तेथे सर्वच गरजांची पूर्तता पूर्ण करणे गावकऱ्यांच्या प्रत्यक्ष गरजा आणि समस्यांनुसार विकास आराखडा तयार करता येतो,ज्यामुळे योजना अधिक प्रभावी ठरतात.

    शाश्वत विकास भावी पिढ्यांच्या गरजा लक्षात घेऊन पर्यावरणाचा समतोल राखत विकास साधता येतो.हे सागर अभंग यांनी दाखवून दिले आहे.

    नागरिक म्हणून केवळ मतदानाच्या पलीकडे जाऊन थेट निर्णय प्रक्रियेत सहभागी होण्याची संधी मिळते.परंतु इलेक्शन झाले की रिलेशन जपा हा मूलमंत्र जपत विडणी गावात स्थानिक संसाधनांचा वापर करीत  उपलब्ध स्थानिक संसाधनांचा योग्य आणि शाश्वत वापर करता येतो हे अनेक वेळा गावाने दाखवून दिले आहे.

    लाईव्ह ग्रामसभा करणारे पहिले गाव म्हणून विडणी गावची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे,गावातील सर्व मतदार व्यक्ती (ज्यांचे वय १८ पूर्ण आहे आणि मतदार यादीत नाव आहे) ग्रामसभेचे सदस्य असतात. ग्रामसभेची कार्यकारी समिती ग्रामपंचायत म्हणून काम करते ते सर्वांना माहिती झाले पाहिजे हा उद्देश ठेवून ग्रामपंचायत काम करीत आहे.गावचा विकास आराखडा अन् परफेक्ट नियोजन गावाच्या विकासाचा आराखडा तयार करताना लोकप्रतिनिधी आणि नागरिकांचा सहभाग आवश्यक आहे.तो या विडणी गावाने आदर्श घेतला त्यामुळे गावचा सर्वांगीण विकासासाठी लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांना नेहमीच ग्रामस्थ साथ देतात, गरजांनुसार आराखड्यात बदल करण्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा असतो श्रमदान विकास कामांमध्ये श्रमदान करून योगदान देणे हे गावाने अनेकवेळा दाखवून दिले त्याचे उत्तम उदाहरण म्हणजे गावातील सुसज्ज असे वाचनालय अन् अभ्यासिका होय,गावात स्वयंसेवा विविध विकास कामांमध्ये स्वयंसेवा करणे.

    जागरूकता निर्माण करणे गावातील विकास योजना आणि विकास कामांबद्दल जागरूकता निर्माण करणे व प्रत्येक व्यक्तीपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यात यशस्वी गाव झाले आहे.

    या मध्ये शासनाचे उपक्रम,आमचा गाव-आमचा विकास गावाच्या सर्वांगीण विकासासाठी विडणी ग्रामपंचायतींच्या माध्यमातून लोकसहभाग वाढवण्यासाठी राज्य शासनाने आखून दिलेले सर्वच उपक्रम हाती घेतला आहे.असे सातारा जिल्ह्यातील एकमेव गाव म्हणजे ते विडणी आहे.गावात राष्ट्रीय ग्राम स्वराज अभियान शाश्वत विकासाची ध्येये साध्य करण्यासाठी पंचायत राज संस्थांमध्ये लोकसहभाग वाढवणे, हा या अभियानाचा उद्देश आहे.तो विडणी गावाने आदर्श घेतला असून लोकनियुक्त सरपंच सागर अभंग यांच्या नेतृत्वाखाली हे गाव नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रात लोकवर्गणीतून सायकल ट्रॅक व जॉगिंग ट्रॅक निर्माण करणारे उत्तम उदाहरण बनेल यात अजिबात शंका नाही असे मत ग्रामस्थानी बोलून दाखवले आहे.

No comments