सोमवार पेठेतील उमेश पवार, पप्पू पवार यांची भाजपमध्ये घरवापासी ; राजे गटातील प्रवेश अल्पकाळातच संपुष्टात
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि १७ - सोमवार पेठेतील पप्पू पवार यांनी आपल्या समर्थकांसह पुन्हा एकदा भारतीय जनता पक्षात प्रवेश केला आहे. विशेष म्हणजे काही दिवसांपूर्वीच त्यांनी राजे गटात प्रवेश केला होता; मात्र अल्पावधीतच त्यांनी आपली भूमिका बदलत भाजपची वाट धरल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे. या प्रवेशावेळी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, जेष्ठ नेते प्रल्हादराव साळुंखे पाटील, श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर, धनंजय साळुंखे पाटील, युवानेते अभिजित नाईक निंबाळकर,माजी सनदी अधिकारी, विश्वासराव भोसले, विक्रमआप्पा भोसले, देवीदास पवार- पाटील, प्रसाद पवार - पाटील, सचिन रनवरे,संजय गायकवाड उपास्थित होते.
यावेळी बोलताना उमेश पवार म्हणाले की, मी राजे गटात प्रवेश केला होता मात्र त्या ठिकाणी मला बालिशपणा जास्त वाटला. कोणत्याही गोष्ट सिरीयस वाटल्या नाहीत. मी राजे गटात प्रवेश केल्यानंतर मला रात्रभर झोप लागली नाही, व सकाळीच पुन्हा एकदा भाजपमध्ये प्रवेश करण्याचे ठरविले.

No comments