जैन व्यापारी बांधवांचा भाजपात प्रवेश ; प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढेल - रणजीतसिंह नाईक निंबाळकर
फलटण गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१५ - माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या विकासाच्या दूरदृष्टीने आज अनेक जैन बांधवांनी भाजपात प्रवेश करीत, भाजपाच्या विजयाचा इरादा पक्का केला असून, या प्रवेशाने भाजपमध्ये चैतन्यमय वातावरण निर्माण झाले आहे. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्यासह भाजपाचे 27 नगरसेवक पदाचे उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी संपादित करतील असा विश्वास जैन समाजाने व्यक्त केला.
फलटण नगरपालिका निवडणूक ही खूप वेगवेगळ्या घटनांनी गाजत असताना आज राजे गटाला जोरका झटका देत, अनेक व्यापारी जैन बांधव यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा होत असलेला विकास आणि असलेले विकासाचे व्हिजन या दुहेरी मार्गावरून जाण्यासाठी त्याचबरोबर बाजारपेठेला नवचैतन्य निर्माण होण्यासाठी भाजपाला साथ देत, आज व्यापाऱ्यांनी आपल्या भाजपामध्ये प्रवेश करून आम्ही रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली नगरपालिका निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार समशेरसिंह हिंदुराव नाईक निंबाळकर यांच्यासह इतर 27 उमेदवारांच्या प्रचारासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून विकासाचे अन बाजारपेठेला झळाली आणण्यासाठी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यासोबत जात असल्याचे स्पष्ट केले.
यावेळी माजी खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर यांनी, व्यापारांच्या या प्रवेशामुळे भाजपची ताकद वाढेल व फलटणमधील राजकारणाला कलाटणी मिळेल असे सांगतानाच सर्व जैन बांधवांचे तसेच व्यापाऱ्यांचे बाजारपेठेतील प्रश्न सोडविण्याचे वचन दिले, त्याचबरोबर फलटण शहरातील व्यापाऱ्यांबरोबर यापुढे चर्चा करून सर्व प्रश्न निकाली काढण्यासाठी मी त्यांच्यासोबत असेल असे वचन दिले यावेळी जैन बांधव व भगिनी मोठ्या संख्येने या भाजपा प्रवेशावेळी उपस्थित होते.

No comments