भाजपाच्या विशाल पाटील यांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि १७ - शिवसेना जिल्हाध्यक्ष चंद्रकांत जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपाचे कट्टर कार्यकर्ते विशाल पाटील यांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. या प्रवेशामुळे शिवसेनेची संघटनात्मक ताकद अधिक बळकट होणार असल्याचे मत उपस्थितांनी व्यक्त केले.
या प्रसंगी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, प्रभाग क्रमांक तीनच्या उमेदवार सौ. पुनम भोसले तसेच शिवसेनेचे तालुकाध्यक्ष नानासो इवरे उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी विशाल पाटील यांचे शिवसेनेत स्वागत करून त्यांना पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शिवसेनेच्या ध्येयधोरणांवर विश्वास ठेवून आपण पक्षात प्रवेश करत असल्याचे विशाल पाटील यांनी यावेळी सांगितले. आगामी काळात पक्षवाढीसाठी व जनहिताच्या कामांसाठी सक्रियपणे काम करणार असल्याची ग्वाही त्यांनी दिली.
.jpg)
No comments