समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचाराला मतदारांचा मिळतोय चांगला प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१० - नगराध्यक्ष पदाचे उमेदवार समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार फेरीला प्रभाग क्रमांक 8 मध्ये प्रचंड मोठा प्रतिसाद मिळत असून एकच वादा समशेर दादा अशा घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडला होता यावेळी माजी नगरसेवक अजय माळवे,उमेदवार फिरोज आतार,सिद्धाली शहा यांच्या सुधीरशेठ शहा, प्रभारी युवराज सस्ते, बंडू शिंदे, जालिंदर सस्ते यांच्यासह भाजपा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते सह शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.
नगराध्यक्ष पदासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून वाढता पाठिंबा मिळत असून त्यांच्यासाठी तसेच इतर उमेदवारांना प्रचंड मताधिक्याने निवडून आणण्यासाठी प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचून माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच इतर सर्वच नगरसेवक निवडून आणण्यासाठी भाजप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते कार्यकर्ते मोठी मेहनत घेत असून प्रभाग 8 मध्ये प्रत्येक घरात समशेरसिंह नाईक निंबाळकर यांचे मोठ्या उत्साहात स्वागत करण्यात आले.

No comments