प्रभाग 12 मध्ये विकास काकडे सरांच्या प्रचाराला वेग; नागरिकांचा वाढता प्रतिसाद
फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक 12 मध्ये विकास काकडे सरांच्या प्रचाराने चांगलाच वेग घेतला आहे. सामाजिक, शैक्षणिक आणि सहकार क्षेत्रात तब्बल 45 ते 50 वर्षांचा दांडगा अनुभव असलेल्या काकडे सरांवर नागरिकांचा दृढ विश्वास असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.
काकडे सरांची वैशिष्ट्यपूर्ण कार्यशैली म्हणजे – माणूस कोण आहे हे न पाहता, त्या माणसाचे काम काय आहे ते समजून घेऊन ते मार्गी लावणे! या गुणामुळे नागरिकांचा विश्वास त्यांनी वर्षानुवर्षे कमावला आहे. शैक्षणिक क्षेत्रातही त्यांचे योगदान मोठे आहे. कोणताही विद्यार्थी अडचणीत असला, मदतीची गरज भासली की काकडे सर तत्परतेने मदत करतात, हे अनेकांच्या अनुभवातून सिद्ध झालेले आहे.
साहित्य, विचार संस्कृती आणि समाजकार्य यांची जाण असलेल्या काकडे सरांनी गेल्या अनेक दशकांत समाजातील अनेकांची छोटी–मोठी कामे पूर्ण करून दिली आहेत. त्यामुळेच त्यांच्या नावाला एक विश्वासाचे मूल्य प्राप्त झाले आहे.
विकास काकडे सरांनी हातात धनुष्यबाण घेतला आहे म्हणजे सरांचा नेम कधीच चुकणार नाही हा सरांचा स्वतःवरील आत्मविश्वास दिसून येतो. प्रभाग क्रमांक 12 मध्ये नागरिकांच्या गाठीभेटी आणि त्यांच्याशी सुसंवाद चांगल्या पद्धतीने साधत आहे. नागरिकांचा कल ही त्यांच्याच बाजूने झुकलेला दिसून येत आहे. म्हणजे नागरिकांचा सरांना चांगला प्रतिसाद मिळत आहे.
प्रचाराला वेग मिळत असताना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते – काकडे सर इतरांप्रमाणे फक्त आश्वासने देत नाहीत, तर काम उत्तम करण्याची गॅरंटी देतात. सामाजिक चळवळीत त्यांचा सक्रिय सहभाग आणि दीर्घकालीन अनुभव पाहता प्रभाग 12 मध्ये त्यांचा विजय निश्चित असल्याचे राजकीय निरीक्षकांकडून बोलले जात आहे.

No comments