श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर यांच्या होम टू होम प्रचाराला प्रचंड प्रतिसाद ; घरोघरी होत आहे स्वागत
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१२ - फलटण नगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीमध्ये नगराध्यक्षपदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये पाठिंबा मिळत असून, त्यांच्या प्रचार दौऱ्यात होम टू होम भेट देत असताना,श्रीमंत अनिकेतराजे यांचे मोठ्या उत्साहात स्वागत होत असून, श्रीमंत अनिकेतराजे यांच्या विजयासाठी युवावर्गासह नागरिक त्यांच्या प्रचारात सहभागी होत आहेत.
शिवसेनेचे अधिकृत उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर हे गेली अनेक दिवस फलटण शहरातील प्रत्येक मतदारांच्या भेटीगाठी घेण्यासाठी स्वतः जात असून, त्यांचे सर्वच ठिकाणी मोठ्या उत्साहात स्वागत होत आहे, अनिकेतबाबा तुम आगे बढो, हम तुम्हारे साथ है, आला रे आला, शिवसेनेचा वाघ आला. अशा पद्धतीने घोषणांनी संपूर्ण परिसर दणाणून सोडत त्यांचे प्रत्येक घरी खूप मोठे उत्साहात स्वागत करीत, आम्ही तुमच्या सोबत आहोत असे वचन मतदार देत असून, त्यांना मतदारांचा भरघोस पाठिंबा दिवसेंदिवस वाढतच आहे. येणाऱ्या निवडणुकीमध्ये नगराध्यक्ष पदासाठी श्रीमंत अनिकेतराजे उच्चशिक्षित त्याचबरोबर कर्तुत्ववान वारसा जोपासत असून त्यांच्या प्रचारात 13 प्रभागांमध्ये तरुण, महिला मतदार मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत.
शिवसेना नेते तथा माजी मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे, सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार शंभूराज देसाई, संपर्कप्रमुख शरदराव कणसे यांच्या मार्गदर्शनाखाली नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांना फलटण शहरातून मोठा प्रतिसाद मिळत आहे, समाजकारणाबरोबरच राजकारणामध्ये आपली दमदार एन्ट्री करणाऱ्या अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांचा विजय नक्की मानला जात असून, हजारो मतदार त्यांचे उत्साहात स्वागत करीत आहेत.

No comments