Breaking News

श्रीमंत रामराजे यांच्या नेतृत्वाखाली केलेल्या विकासकामांमुळे सौ.सुवर्णाताई खानविलकर यांचा विजय निश्चित

The victory of Mrs. Suvarnatai Khanwilkar is assured due to the development works carried out under the leadership of Shrimant Ramraje

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.13 - - विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली माजी नगरसेविका तथा प्रभाग क्रमांक आठच्या  उमेदवार सौ. सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर यांनी आपल्या पाच वर्षाच्या कालावधीमध्ये कोट्यावधी रुपयांचा विकास आपल्या प्रभागात करीत, एक नवीन इतिहास केला असल्याचे स्पष्ट मत स्वतः मतदारांनी बोलून दाखवले. यामुळे त्यांचा विजय हा निश्चित असल्याचे मत मतदारांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केले.

    फलटण तालुक्याचे भाग्यविधाते आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली सौ. सुवर्णा अमरसिंह खानविलकर यांनी आपले पती अमरसिंह खानविलकर उर्फ आप्पा तसेच आपले चिरंजीव प्रीतसिंह खानविलकर या कुटुंबाने प्रत्येक व्यक्तीच्या नेहमीच सुखदुःखात सहभागी होऊन, एक आगळीवेगळी ओळख  फलटण शहराला करून दिली, त्याचबरोबर श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली ह.बा.कुलकर्णी घर ते रवी शिंदे घर डांबरी रस्ता, जय हिंद कोल्ड्रिंक्स ते डॉक्टर जगताप दवाखाना डांबरी रस्ता, रंगारी महादेव मंदिर परिसर बाजारे गुरुजी ते पारडेकर मठापर्यंत रस्ता करणे, डॉ राजवैद्य पिछाडी रस्ता करणे, रंगारी महादेव परिसर, अवस्थान मंदिर ते गणदास घर रस्ता करणे, रंगारी महादेव परिसर माने घर ते टंगसाळे घर रस्ता करणे, महादेव मंदिर परिसर कदम घर ते राजेंद्र मठपती घर रस्ता करणे, वेलनकर दत्त मंदिर ते बारस्कर चौक रस्ता करणे, रचना अपार्टमेंट ते यश आपारमेंट हनुमान मंदिर रस्ता डांबरीकरण, जी जी पवार घर ते राजेंद्र भिंगरे घर रस्ता डांबरीकरन, आर व्ही निंबाळकर घर ते संजय हिंगे घर रस्ता डांबरीकरण, दगडी पूल ते बाळासो सुतार घर रस्ता डांबरीकरण, शंकर मार्केट ते कुसवळघर रस्ता डांबरीकरण, सुनील तेली घर ते दगडी पूल रस्ता डांबरीकरण रमण शेठ दोशी घर ते मारवाड पेठ रस्ता डांबरीकरण, चावडी चौक ते माणिकराव देशमाने घर रस्ता डांबरीकरण, वामन चौक ते दगडी फुल रस्ता डांबरीकरण, जैन मंदिर ते बारस्कर चौक रस्ता डांबरीकरण, तेज आपारमेंट ते दगडी फुल रस्ता डांबरीकरण, हनुमान नगर कमाल ते कुंभार भट्टी रस्ता डांबरीकरण, बापूदास नगर कमाल ते घोलपगमव्हर रस्ता करणे, ॲक्शन चौक ते भोईटे घर रस्ता करणे, शिवाजी रोड पेटकर घर ते दगडी पूल असा रस्ता करणे, अशी कोट्यावधी रुपयांची विकास कामे सुवर्णाताई खानविलकर यांनी केल्याने त्याचा फायदा नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर, विशाल तेली यांच्यासह सुवर्णाताई अमरसिंह खानविलकर यांना होत असून या तिघांचे प्रभाग क्रमांक आठ मध्ये मतदारांनी अतिशय उत्साहामध्ये स्वागत केले. त्याचबरोबर विकासाचे महामेरू आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या दूरदृष्टीने फलटण शहराचा कायापालट झाला असून विरोधक फक्त प्रत्येक गोष्टीत राजकारण करून विकासाची दिशा बोलण्याऐवजी फक्त आणि फक्त आरोप करीत असून , त्यांच्या टीकेला मतदार बंधू भगिनी नक्कीच मतपेटी द्वारे धनुष्यबाणावर मतदान करून विरोधकांचा करीत असलेला केविलवाना प्रयत्न नक्कीच हाणून पाडतील असा ठाम विश्वास युवा नेते प्रीतसिंह अमरसिंह खानविलकर यांनी आमच्या प्रतिनिधीकडे बोलून दाखविला आहे.

No comments