Breaking News

प्रभाग 12 मध्ये भाजपाला बळ ; अनेकांचा रणजितसिंह यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश

BJP gains strength in Ward 12; Many join BJP under the leadership of Ranjit Singh

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - फलटण नगरपरिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग 12 मध्ये राजकीय समीकरणे वेगाने बदलत आहेत.  प्रभागातील अनेक नागरिक, युवा कार्यकर्ते, महिलांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षात प्रवेश केला. याप्रसंगी प्रभाव 12 मधील भाजपाचे उमेदवार अरुण खरात व सौ. स्वाती फुले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

    प्रभागातील स्थानिक प्रश्न, विकासकामांची गरज आणि भाजपचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन हा निर्णय घेतल्याचे नवीन प्रवेशकर्त्यांनी सांगितले. यावेळी अनेकांनी प्रभागाच्या विकासासाठी एकजुटीने काम करणार असल्याचा संकल्प व्यक्त केला. या वेळी बोलताना रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले की,फलटण शहरातील सर्व प्रभागांत विकासाची दिशा तयार करण्यासाठी सक्षम नेतृत्व आणि जनतेचा विश्वास आवश्यक आहे. आज प्रभाग 12 मधील नागरिकांनी दाखवलेला विश्वास म्हणजे आगामी निवडणुकीतील मोठा संकेत आहे."

    प्रवेश घेतलेल्या कार्यकर्त्यांचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. या प्रवेशामुळे प्रभाग 12 मधील निवडणूकीचे नवीन समीकरण निर्माण झाले असून आगामी निवडणुकीत भाजपाला मजबुती मिळणार असल्याचे राजकीय तज्ञांचे मत आहे.

No comments