Breaking News

फलटण येथील कृषीदुतांचे दुधेबावी येथे स्वागत

Agricultural ambassadors from Phaltan welcomed at Dudhe Bavi

    फलटण प्रतिनिधी  दि.7/12/2025 - ग्रामीण जागरूकता कार्यानुभव व औद्योगिक जोड प्रकल्प २०२५-२६ कार्यक्रमांतर्गत फलटण एज्युकेशन सोसायटीचे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषीदुत यांचे रविवार दि.7 डिसेंबर रोजी दुधेबावी येथे मान्यवरांच्या उपस्थितीत स्वागत करण्यात आले.

    यावेळी गावच्या सरपंच मा.सौ. भावना माणिकराव सोनवलकर, उपसरपंच मा.श्री. तानाजी भगवान नाळे, कृषी सहाय्यक श्री सागर पवार, ग्रामसेवक श्री. वाय.एस.शेळके, प्रगतशील शेतकरी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.

    पुढील दहा आठवड्यांमध्ये राबवण्यात येणाऱ्या शेतीविषयक प्रात्यक्षिक, गटचर्चा, जनावरांचे लसीकरण, वृक्षारोपण, शेतकरी शास्त्रज्ञ चर्चा, आधी कार्यक्रमाविषयी थोडक्यात कृषी दुतांकडून माहिती देण्यात येणार आहे. हे कार्यक्रम यशस्वीरित्या राबवण्यासाठी आपले सहकार्य मार्गदर्शन मिळावे अशी विनंती कृषीदुतांनी  केल्यानंतर सर्वांनी त्याला अनुमती दिली. कृषी महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ.यु.डी. चव्हाण, श्रीमंत शिवाजी राजे उद्यानविद्या महाविद्यालय फलटणचे प्राचार्य डॉ.एस.डी. निंबाळकर, समन्वयक प्रा. एन. एस. धालपे, कार्यक्रम अधिकारी प्रा. एस. एम. साळुंखे, प्रा.एन.ए.पंडित, प्रा. डॉ. जी.बी. अडसूळ यांच्या मार्गदर्शनाखाली कृषी दुत रामराजे कुलाळ, अभिषेक मोरे, ऋषिकेश ओंबासे, रोहित वाघमारे, प्रणव साळुंखे, झहीर मणेरी, श्रीराम मोहिते हे विविध कार्यक्रम राबवणार आहेत, तसेच शेतकऱ्यांच्या अनुभव, त्यांच्या शेती पद्धतीचा सखोल अभ्यास करणार आहेत.

No comments