दत्तनगर-फलटण भाजप प्रवेश प्रकरणावर मोठा खुलासा ; प्रवेश फक्त चर्चेसाठी ; प्रत्यक्ष कार्यकर्ते शिवसेनेसोबतच
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.८ - दत्तनगर, फलटण परिसरातील काही कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश झाल्याची चर्चा सुरू असताना, या प्रकरणावर शिवसेना उमेदवार विकास काकडे व स्मिता शहा यांनी महत्त्वाचा खुलासा केला आहे. “दत्तनगर-फलटणमधील भाजप प्रवेश हा फक्त चर्चेपुरता होता. प्रवेशात दाखवलेली काही नावे प्रत्यक्षात त्या भागातील मतदारही नाहीत,” असे काकडे यांनी सांगितले.
याबाबत अधिक माहिती देताना त्यांनी सांगितले की, “ज्यांची नावे भाजप प्रवेशात दाखवली गेली, ते कार्यकर्ते आज आमच्यासोबत ठामपणे उभे आहेत. कोणताही भ्रम नको; दत्तनगरातील खरा कार्यकर्ता शिवसेनेच्या पाठीशी आहे.”
दरम्यान, दत्तनगर व प्रभाग क्रमांक 11 मधील अनेक कार्यकर्त्यांनी उमेदवार विकास काकडे आणि स्मिता शहा यांची भेट घेत, “आम्ही तुमच्याच सोबत आहोत,” असा विश्वास व्यक्त केला. या भेटीदरम्यान श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर व इतर मान्यवर उपस्थित होते.
या खुलास्यानंतर दत्तनगर-फलटणमधील चर्चेला वेगळे वळण मिळाले असून, स्थानिक राजकारणात या घडामोडींची चांगलीच चर्चा रंगत आहे.

No comments