प्रभाग ११ मध्ये प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) – फलटण नगरपरिषद निवडणुकीत प्रभाग क्रमांक ११ मधून सौ. प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांच्या उमेदवारीला नागरिकांचा उत्स्फूर्त आणि सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. सद्गुरु व महाराजा उद्योग समूहाचे संस्थापक आणि माजी नगराध्यक्ष दिलीपसिंह भोसले यांची स्नुषा तसेच महाराजा मल्टिस्टेटचे उपाध्यक्ष रणजितसिंह भोसले यांच्या पत्नी म्हणून सामाजिक क्षेत्रात भोसले कुटुंबाची भक्कम परंपरा पुढे नेण्याचे काम त्या करत आहेत.
स्वतः सौ. प्रियदर्शनी भोसले या सद्गुरू शिक्षण संस्थेची जबाबदारी समर्थपणे सांभाळत असून शिक्षण, सामाजिक उपक्रम आणि प्रभागातील सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर तत्परतेने काम करण्यासाठी त्या ओळखल्या जातात. प्रभागात त्यांचा दांडगा जनसंपर्क असून विशेषतः महिला व युवतींच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांनी घेतलेले पुढाकार नागरिकांमध्ये विश्वास निर्माण करणारे ठरले आहेत.
यामुळे प्रभाग ११ मधील मतदारांमध्ये प्रियदर्शनी रणजितसिंह भोसले यांच्या उमेदवारीबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून त्यांच्या उमेदवारीला मिळणारा उत्स्फूर्त प्रतिसाद दिवसेंदिवस वाढत असल्याचे चित्र दिसत आहे.

No comments