Breaking News

प्रभाग १२ मध्ये शिवसेना व मित्रपक्षाची भव्य प्रचार फेरी

Shiv Sena and its allies conduct grand campaign in Ward 12

     फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६  - फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (एकनाथ शिंदे) व राजे गटामार्फत भव्य प्रचार फेरी  स्वामी विवेकानंद नगर येथे काढण्यात आली. नगराध्यक्ष पदाचे उमेदवार श्रीमंत अनिकेतराजे नाईक निंबाळकर, तसेच प्रभाग क्र. १२ चे नगरसेवक पदाचे उमेदवार विकास वसंतराव काकडे आणि स्मिता शहा यांच्या प्रचार यात्रेची सुरुवात जल्लोषमय वातावरणात करण्यात आली.

    कार्यक्रमाची सुरुवात  स्वामी विवेकानंद नगरातील श्रीमंत गणपती मंदिरात श्रीफळ वाढवून करण्यात आली. मंदिर परिसरात झालेल्या या कार्यक्रमास मतदार बांधव, महिला आणि विशेषतः तरुण वर्गाचा मोठ्या प्रमाणात सहभाग दिसून आला.

    प्रचार फेरीदरम्यान उमेदवारांनी नागरिकांचे अभिवादन स्वीकारत विविध स्थानिक प्रश्न, विकासकामे, सुविधा आणि भविष्यातील नियोजन याबाबत चर्चा केली. नागरिकांकडूनही विविध समस्या मांडण्यात आल्या व त्यावर सकारात्मक तोडगा काढण्याचे आश्वासन उमेदवारांनी दिले. लोकांमध्ये विश्वासाचे वातावरण निर्माण करत उमेदवारांनी फलटणच्या सर्वांगीण विकासासाठी आपली भूमिका सुस्पष्ट केली.

    उमेदवारांच्या सभोवती दिसणारा ऊर्जावान तरुण वर्ग आणि महिलांचा मोठा सहभाग पाहता प्रचार मोहीमेची जोरदार सुरुवात झाल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते. समाजातील सर्व घटकांचा सहभाग पाहून आगामी निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) चे उमेदवार प्रभावी स्पर्धा देणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

No comments