Breaking News

इतर उमेदवार प्रचारात ! मात्र संदीप चोरमले कामात व्यस्त

Other candidates are campaigning! But Sandeep Chormale is busy with work

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ -नगरपरिषदेच्या निवडणूक प्रचाराला जोर येत असतानाच प्रभाग क्रमांक ११ मध्ये एका वेगळ्याच घटनेची नागरिकांमध्ये चर्चेला सुरुवात झाली आहे. बहुतांश उमेदवार प्रचारात व्यस्त असताना, प्रभाग ११ चे उमेदवार संदीप चोरमले मात्र प्रत्यक्ष कामात गुंतलेले दिसून आले.

    लक्ष्मीनगर परिसरात गटार तुंबल्यामुळे सांडपाण्याचा त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी चोरमले यांच्याकडे प्रचारादरम्यान केली. तक्रार मिळताच चोरमले यांनी प्रचाराला विराम देत तातडीने घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी स्वखर्चाने गटार पाईप बसवून गटार स्वच्छ करून घेतले आणि परिसरातील अस्वच्छतेचा प्रश्न मार्गी लावला.

    निवडणुकीची रणधुमाळी शिगेला पोहोचली असतानाच उमेदवार स्वतः वेळ काढून नागरिकांची अडचण दूर करत असल्यामुळे प्रभागात याची मोठी चर्चा सुरू आहे.

    “प्रचारात उमेदवार… पण संदीप चोरमले कामात!”  अशा शब्दांत नागरिकांमध्ये चर्चा रंगताना दिसत आहे.

No comments