फलटण नगरपरिषद निवडणूक : प्रभाग 2 मध्ये ‘टीव्ही’ ची जादू पुन्हा चालणार का?
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - प्रभाग क्रमांक २ मध्ये अपक्ष उमेदवार म्हणून टीव्ही चिन्ह पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. फलटण नगरपरिषदेच्या इतिहासात माजी उपनगराध्यक्ष स्वाती आशिष अहिवळे यांनी सत्ताधारी आणि विरोधक अशा दोन्ही पक्षांना चितपट करत टीव्ही चिन्हावर विजय मिळवला होता. त्या विजयाने अपक्ष राजकारणात एक वेगळा ठसा उमटवला होता.
यंदाच्या 2025 च्या नगरपालिका निवडणुकीतही प्रभाग २ मध्ये टीव्ही चिन्ह पुन्हा मैदानात आले असून, सोनू संग्राम अहिवळे या अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरल्या आहेत. त्यामुळे पूर्वीप्रमाणेच ‘टीव्हीची जादू’ पुन्हा चालणार का? असा प्रश्न प्रभागात चर्चेचा विषय बनला आहे.
सोनू संग्राम अहिवळे या प्रभाग क्रमांक २ ब मधून निवडणूक लढवत असून त्यांनी दमदार प्रचार मोहीम सुरू केली आहे. घर-दारी भेटी, थेट संवाद आणि स्थानिक प्रश्नांची माहिती घेण्यावर त्यांनी भर दिला आहे. त्यांच्या उमेदवारीला प्रभागातील नागरिकांकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असल्याचे चित्र दिसत आहे.
संग्राम अहिवळे हे प्रभागातील सामाजिक कार्य, लोकांच्या अडीअडचणी सोडविण्यात सक्रिय भूमिका आणि सततची लोकसहभागाची शैली यामुळे परिचित आहेत. त्या कार्याचा थेट फायदा त्यांच्या पत्नी सोनू अहिवळे यांच्या उमेदवारीला होईल, असे स्थानिकांमध्ये बोलले जात आहे.

No comments