आयुष्यमान भारत योजनेत मोठी वाढ - कुटुंबाला मिळणार दहा लाखांचे विमा संरक्षण : कु. सिद्धाली शहा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२७ - भारत सरकारच्या जनकल्याणकारी आयुष्यमान भारत प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत मोठ्या वाढीची घोषणा करण्यात आली असून, कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीस आता दहा लाख रुपयांपर्यंतचे आरोग्य विमा संरक्षण मिळणार आहे. यापूर्वी हे संरक्षण पाच लाखांपर्यंत होते.
नवीन सुधारणेनुसार वय वर्ष 70 पेक्षा जास्त असलेल्या सर्व नागरिकांनाही या योजनेचा लाभ मिळणार आहे. आरोग्य सुविधांचा जास्तीत जास्त फायदा सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा यासाठी ही योजना अत्यंत उपयुक्त असल्याचे मत भाजपच्या प्रभाग ८ (ब) मधील उमेदवार कु. सिद्धाली अनुप शहा यांनी व्यक्त केले.
सिद्धाली शहा म्हणाल्या की, “आरोग्य हीच खरी संपत्ती आहे. गरज असताना उपचारांचा खर्च मोठा अडथळा ठरतो. अशावेळी दहा लाखांचे संरक्षण ही मोठी दिलासा देणारी बाब आहे. प्रत्येक पात्र नागरिकाने या योजनेचा लाभ जरूर घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.”

No comments