नंदकुमार भोईटे यांच्या स्वप्नातील फलटण सत्यात उतरवण्यासाठी आम्हाला संधी द्यावी - अमित भोईटे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - स्व.नंदकुमार भोईटे यांच्या स्वप्नातील फलटण शहर सत्यात उतरवण्यासाठी तसेच सर्वांगीण विकासासाठी कटीबद्ध असलेले माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले तरुणांचे आशास्थान समशेरसिंह नाईक निंबाळकर तसेच प्रभाग क्रमांक 10 मधून मी स्वतः अमित भोईटे अन् रेहाना मोमीन यांच्या सह आम्हा तिघांना भरघोस मतांनी निवडून देऊन लोकसेवेची संधी द्यावी असे आवाहन उमेदवार अमित भोईटे यांनी केले.
फलटण नगरपालिका प्रचारा दरम्यान पत्रकारांनी त्यांच्याशी संवाद साधला, तेव्हा ते बोलत होते. यावेळी बोलताना अमित भोईटे यांनी सांगितले की माढा लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर तसेच आमदार सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली फलटण शहराचा विकास हा बारामती शहराच्या विकास धर्तीवर करण्यासाठी भाजपा व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी आरपीआय, रयत क्रांती संघटना व महायुतीचे मित्र पक्ष यांनी फलटण शहराचा विकास हाच आमचा ध्यास या टॅगलाइन नुसार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या संकल्पनेतील फलटण शहर खड्डेमुक्त तसेच स्वच्छ व निर्जंतुनुक पिण्याचे पाणी,संपूर्ण परिसरातील स्वच्छता तसेच आरोग्य सेवा याचबरोबर इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी भाजपा राष्ट्रवादी काँग्रेस व मित्रपक्षाच्या उमेदवारांना आपले बहुमोल मत देऊन लोकसेवेची संधी द्यावी असे आवाहन अमित भोईटे यांनी केले.

No comments