उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली फलटणचा सर्वांगीण विकास होईल - संपर्क प्रमुख शरदराव कणसे
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२६ - महाराष्ट्र राज्यातील सर्वाधिक लोकप्रिय असलेले उपमुख्यमंत्री तथा नगर विकास मंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना पक्ष हा विकासाचा मुद्द्यावर सर्व पालिका अन् नगरपंचायतीच्या निवडणुका लढवित असून फलटण मध्ये सुद्धा शिवसेनेचा भगवा पालिकेवर फडकविण्यासाठी आम्ही सज्ज असून, फलटण शहराचा सर्वांगीण विकास करून मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शिवसेनेच्या पाठीशी जनता खंबीरपणे उभी राहिली असल्याचे मत शिसेनेचे सातारा जिल्हा संपर्क प्रमुख शरदराव कणसे यांनी केले.
नगर विकास खाते हे उपमुख्यमंत्री ना.एकनाथ शिंदे साहेब यांच्याकडे असल्याने फलटण शहरातील रस्ते,पिण्याचे मुबलक व वेळेवर पाणी पुरवठा त्याच बरोबर शहरातील विविध भागातील विकासाची गंगा पोहोचविण्यासाठी शिवसेनेचे नगराध्यक्ष पदासाठी उभे असलेले ॲड. श्रीमंत अनिकेतराजे रामराजे नाईक निंबाळकर यांच्या पाठीशी सर्वांनी उभे राहून, त्यांना प्रचंड मतांनी निवडून द्यावे, असे आवाहन केले. त्याचबरोबर आम्ही शिवसेना पक्षाने व मित्र पक्ष यांनी दिलेले सर्वच उमेदवार हे तरुण त्याचबरोबर उच्च शिक्षित अन् सामाजिक कामाची आवड असलेले असून, त्यांना फलटण शहरात विविध भागात मतदारांनी चांगला प्रतिसाद दिला असून त्यांचा विजय हा पक्का असल्याचे मत शरदराव कणसे यांनी सांगितले.
यावेळी बोलताना संपर्क प्रमुख शरदराव कणसे यांनी सांगितले की शिवसेना हा सर्वसामान्य नागरिकांना आपला पक्ष वाटत असून फलटण शहरातील जनतेने शिवसेना पक्ष त्याचबरोबर मित्र पक्षांच्या उमेदवारांना चांगल्या बहुमताने निवडून देऊन फलटण शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी संधी द्यावी अशी मागणी सर्व मतदार बंधू भगिनींना केली आहे.

No comments