श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्याचा ऊस दर केला जाहीर; ३३०० रुपये प्रति टन
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण तालुक्यातील श्रीराम सहकारी साखर कारखान्यानंतर आता श्रीदत्त इंडिया प्रा. लि. साखर कारखान्यानेही ऊसदराच्या कोंडीतून मार्ग काढत गळीत हंगाम 2025-26 साठी उसाला 3,300 रुपये प्रति टन इतका दर जाहीर केला आहे. कंपनीचे प्रशासकीय अधिकारी अजितराव जगताप यांनी ही माहिती मुख्य प्रशासकीय कार्यालयात झालेल्या बैठकीत दिली.
यावेळी बोलताना जगताप म्हणाले की, महाराष्ट्र विधान परिषदेचे माजी सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, कंपनीच्या अध्यक्षा प्रीती रूपारेल व संचालक जितेंद्र धारू यांच्या मार्गदर्शनाखाली कंपनी सुयोग्यरीत्या पुढे जात आहे. शासन निर्णयानुसार कंपनीवर 3,056 रुपये इतकी एफआरपी रक्कम देणे बंधनकारक आहे. मात्र शेतकरी आणि संघटनांच्या मागणीचा विचार करून कंपनी अतिरिक्त 244 रुपये देत एकूण दर 3,300 रुपये प्रति टन जाहीर करत आहे.

No comments