कोळकी ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार सुरू - सौ.रेश्माताई देशमुख व विकास नाळे
फलटण (गंधवार्ता वृत्तससेवा) दि.२४ - कोळकी ग्रामपंचायत सरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांचा मनमानी कारभार सुरू आहे,मासिक मीटिंग मध्ये विषय घेतले जात आहेत,ती विकास कामे न मंजूर करता दुसरीच कामे केली जात असून, या सर्व कारभाराचा आम्ही निषेध करतो, त्याचबरोबर कोळकी शहरालगतची मोठी ग्रामपंचायत असताना मूलभूत सुविधा पुरविण्यात सत्ताधारी ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी राजकारण करीत असून गटविकास अधिकारी यांच्या कडे लेखी तक्रार केली असतानाही याची दखल घेतली जात नसून, सरपंच या फक्त चहा पिण्यासाठीच ग्रामपंचायत कार्यालयात येतात, त्या नंतर त्यांचा कारभार दुसरेच बघत असून, संपूर्ण कारभाराची सखोल चौकशी करण्याची मागणी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे करणार असल्याचे स्पष्ट करीत सत्ताधाऱ्यांनी कोळकी गाव भकास करण्याचा घाट घातला असून, यांच्या विचित्र व नाकर्ते पनाच्या कारभाराचा पुराव्यासह पंचनामा माजी उपसरपंच विकास नाळे यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच इतर विद्यमान ग्रामपंचायत सदस्यांनी आपापल्या वॉर्ड मधील सुविधांचा पाढाच पत्रकार परिषदेत वाचला. यामुळे कोळकी ग्रामपंचायत मधील पतीच्या उचापतींना ग्रामस्थ कंटाळले असून, आम्ही आणलेल्या कोट्यवधी रुपयांच्या विकास निधीला सत्ताधारी खो घालत आहेत, असा गंभीर आरोप माजी सरपंच तथा विद्यमान सदस्या सौ.रेश्माताई देशमुख यांनी यावेळी केला.
हॉटेल विसावा येथील झालेल्या पत्रकार परिषदेला सातारा जिल्हा भाजपा सरचिटणीस जयकुमार शिंदे,माजी पंचायत समिती सदस्य सचिन रनवरे, सतीश शेडगे, बाळासाहेब काशिद, संदीप नेवसे, ग्रामपंचायत सदस्या सौ.लक्ष्मी रणजितसिंह निंबाळकर , सौ.रुपाली सागर चव्हाण,सौ.प्राजक्ता सागर काकडे , सौ वर्षा शिंदे ,सजय देशमुख ,रणजीत जाधव, उदयसिंह निंबाळकर , प्रदीप भरते,किरण पखाले,राजन खिलारे, , विष्णु फडतरे,गोरख जाघव, सागर चव्हाण ,उपस्थित होते.
यावेळी बोलताना विकास नाळे व रेश्माताई देशमुख यांनी विद्यमान सरपंच उपसरपंच तसेच ग्रामविकास अधिकारी यांच्या तक्रारींचा पोलखोल केली, गावच्या विकास कामात राजकारण करू नये अशी आमची माफक अपेक्षा होती, विकासकामे होत न्हवती म्हणून, आम्ही विरोधात बसण्याचा निर्णय घेतला, त्यामुळे आम्हाला माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची विकासकामे मंजूर झाली. मात्र त्याला ग्रामपंचायत सरपंच, उपसरपंच यांनी जाणूनबुजून अडथळे आणले,मासिक मीटिंग मध्ये ठराव मंजूर केले जातात एक अन् नंतर दुसरीच कामे केली जातात असा आरोप केला.
सत्ताधारी पक्षा मधून विरोधात गेलो आमची कामे होत नाहीत किंवा डावलली जात आहेत,सरपंच राजकारण करीत आहेत लवकरच निवडणुका होणार आहेत म्हणून आम्ही मंजूर कामे लवकर होण्यासाठी पाठपुरावा करीत असताना सरपंच व ग्रामविकास अधिकारी सांगतो करतो, बघतो अशी उडवाउडवीची उत्तरे आम्हाला देत आहेत, आज ग्रामपंचायत मध्ये लाखो रुपयांचा निधी पडून आहे,तरीही आमच्या वॉर्ड मध्ये रस्ते, गटार व इतर मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यात येत नाहीत,सर्वत्र घाणीचे साम्राज्य पसरले आहे,मासिक मीटिंग मध्ये आम्ही नेहमीच याबाबत सत्ताधाऱ्यांना प्रश्न विचारत असतो परंतु त्याकडे दुर्लक्ष केले जात आहे,आम्ही आठ सदस्यांनी माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांच्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांच्या निधी उपलब्ध करून घेतला आहे मात्र सत्ताधारी व सरपंच उपसरपंच अन् ग्रामसेवक यांच्या आडमुठ्या भूमिकेत असल्याने त्या विविध विकास कामांची टेंडर,वर्क ऑर्डर काढण्यात येत नाहीत,विविध विकास कामांचे ठराव मंजूर आहेत त्याची कामे सुरू करा अशी मागणी आम्ही वेळोवेळी केली असता सरपंच व ग्रामविकास अधिकारी फक्त बघू करू अशी उत्तरे देत आहेत असा आरोप सत्ताधारी गटावर केला.
यामुळे आम्ही आता गावच्या विकासासाठी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांच्या कडे तक्रार करणार असून ग्रामपंचायत कारभाराची चौकशी करण्याची मागणी करणार आहे, आत्तापर्यंत तीस वर्षात कधीही विरोधकांची कामे अडवली नाहीत,मात्र हे प्रत्येक ठिकाणी राजकीय वळण देत आहेत,सर्वात मोठी ग्रामपंचायत असताना पत्रकार परिषद का आयोजित केली याचा प्रश्न उपस्थित होत आहे मात्र विद्यमान सरपंच मॅडम फक्त चहा पिऊन घरी जातात, आमची कामे का होत नाहीत असे विचारले तर ग्रामविकास अधिकारी उत्तरे देत नाहीत, सरपंचांनी ग्रामपंचायत मध्ये प्रतिनिधी नेमले आहेत असा आरोप केला.

No comments