प्रभाग क्रमांक २ मधून सौ. आरती रणदिवे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑक्टोबर - फलटण नगरपरिषदेच्या प्रभाग क्रमांक २ मधून राजे गटाचे कट्टर समर्थक जयकुमार रणदिवे यांच्या पत्नी सौ. आरती जयकुमार रणदिवे यांच्या उमेदवारीची जोरदार मागणी नागरिकांकडून होत आहे.
सामाजिक कार्यकर्ते जयकुमार रणदिवे हे गेली १५ वर्षे प्रभागातील नागरिकांसाठी कार्यरत असून, नागरिकांच्या अडीअडचणी सोडवण्यासाठी नेहमी पुढाकार घेत आले आहेत. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती मंडळाचे अध्यक्षपद भूषवून समाजकार्याची परंपरा जोपासली आहे.
कोरोना काळातही रणदिवे यांनी अनेक गरजू नागरिकांना मदतीचा हात दिला होता. त्यांच्या या कार्यामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी निर्माण झाली आहे.
सौ. आरती रणदिवे या मंगळवार पेठेच्या सुकन्या असून, त्या काकडे कुटुंबातील आहेत. महिलांचे प्रश्न सोडवण्यासाठी आणि समाजातील घटकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्या सातत्याने प्रयत्नशील असतात. त्यामुळे महिला वर्ग आणि युवक वर्ग यांच्याकडूनही त्यांच्या उमेदवारीला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे.
No comments