फलटणमध्ये धुळीच्या त्रासावर प्रशासनाची दखल - गंधवार्ता बातमीचा परिणाम!
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑक्टोबर - फलटण शहरातील पालखी महामार्ग अंतर्गत सुरू असलेल्या काँक्रीट रस्त्यांच्या कामामुळे नागरिकांना होत असलेल्या धुळीच्या प्रचंड त्रासाची बातमी गंधवार्ता ला प्रसिद्ध झाल्यानंतर प्रशासनाने तत्काळ दखल घेतली आहे.
आज रोड सुपरवायझर यांनी स्वतः प्रत्यक्ष स्थळी भेट देऊन, नागरिकांशी चर्चा केली. या चर्चेदरम्यान त्यांनी उद्या पासून दररोज तीन वेळा रस्त्यावर पाणी मारण्याचे आश्वासन दिले आहे, ज्यामुळे धुळीपासून नागरिकांना काहीसा दिलासा मिळणार आहे. महात्मा फुले चौक ते टेलिफोन ऑफिस या रस्त्यावर धुळीमुळे व्यावसायिक, गाळेधारक व नागरिक त्रस्त होते. स्थानिकांनी वेळोवेळी प्रशासनाचे लक्ष वेधले होते.
गंधवार्ता न्यूजने ही बाब ठळकपणे मांडल्याने संबंधित विभागाने त्वरेने कारवाई केली असून नागरिकांकडून गंधवार्ता चे विशेष आभार मानले गेले आहेत. नागरिकांनी सोशल मिडियाद्वारे कळवले की, आज रोड सुपरवायजर आले होते त्यांच्याशी चर्चा झाली उद्या पासून रोज दिवसातून तीन वेळा रोडवर पाणी मारण्याचे आश्वासन दिले, आपल्या बातमी मुळे त्यांनी दखल घेतली आहे, आपले खूप खूप आभार व धन्यवाद.....
No comments