Breaking News

फलटण मॅरेथॉन 2025 मध्ये फलटण रनर ग्रुपचा जलवा!

Phaltan Runner Group shines in Phaltan Marathon 2025!

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१६ ऑक्टोबर -“आपली फलटण मॅरेथॉन 2025” मध्ये फलटण रनर ग्रुपच्या सदस्यांनी उत्कृष्ट कामगिरी करत शहराचा गौरव वाढवला. २१ किलोमीटर धावणे स्पर्धेत विविध वयोगटांमध्ये फलटण रनर ग्रुपच्या धावपटूंनी यश संपादन केले.

    जोश पूर्ण (१८ ते ३० वयोगट) या गटात अक्षय सोमनाथ दंगेकर यांनी प्रथम क्रमांक मिळवून चमकदार कामगिरी केली. सळसळती तरुणाई (३१ ते ४५ वयोगट) या गटात बाळासाहेब म्हस्कोबा शिंगाडे यांनी चतुर्थ क्रमांक पटकावला. तर प्रगल्भ प्रौढ (४६ ते ६४ वयोगट) या गटात माणिक नारायण कांबळे यांनी द्वितीय क्रमांक मिळवला. यंदा आपली फलटण मॅरेथॉनमध्ये २२०० पेक्षा जास्त धावपटूंनी सहभाग घेतला होता. 

फलटण रनर ग्रुपच्या या धावपटूंना डॉ. रवींद्र बिचुकले, डॉ. महेश शिंदे, प्रवीण घोरपडे यांचे तसेच फलटण रनर ग्रुपचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल सर्वत्र अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

No comments