डॉक्टर युवतीच्या आत्महत्या प्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी - फलटण डॉक्टर असोसिएशन
फलटण (गंधवार्ता वृत्तसंस्था) दि.२७ ऑक्टोबर २०२५ - त्या डॉक्टर युवतीला न्याय मिळावा या मागणीसाठी फलटण डॉक्टर असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांना निवेदन देऊन दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
त्या डॉक्टर युवतीने एका हॉटेलमध्ये आत्महत्या केली, तिच्यावर दबाव होता, त्यामुळे तिला त्रास देणाऱ्या अनेक लोकांचा सहभाग प्रथमदर्शनी दिसून येत असल्याने, त्याची निष्पक्ष पणाने चौकशी करण्यात यावी. फलटण उपजिल्हा रुग्णालयात आपले कर्तव्य बजावत असताना तिला प्रचंड त्रास दिला गेला, त्यामुळे तिने आपले जीवन संपविले, तिला न्याय मिळावा अशी मागणी फलटण डॉक्टर असोसिएशन च्या वतीने प्रांताधिकारी प्रियांका आंबेकर यांना आज सोमवारी लेखी निवेदन देत या प्रकरणाची सखोल चौकशी करून त्या डॉक्टर युवतीला न्याय देण्याची मागणी केली.
निवेदनावर डॉ. बी.के.यादव,डॉ. माधव पोळ, डॉ.जे.टी.पोळ, डॉ.रवींद्र सोनावणे,डॉ.सचिन ढाणे,डॉ.मीरा मगर,डॉ.संजय राऊत, डॉ. अश्विनी अब्दागिरे,डॉ.महेश शिंदे,यांचेसह इतर डॉक्टरांच्या निवेदनावर सह्या आहेत.

No comments