Breaking News

नमो पर्यटन सुविधा केंद्राच्या उभारणीसाठी जागा निश्चित करा - पालकमंत्री शंभूराज देसाई

Determine a place for the construction of the Namo Tourism Facilitation Center - Guardian Minister Shambhuraj Desai

    सातारा दि.27 : प्रतापगड किल्ल्याच्या परिसरातील दर्शनी भागात नमो पर्यटन सुविधा केंद्र पर्यटकांसाठी उभारण्यात येणार आहे. या केंद्रासाठी जागा निश्चीत करावी, असे निर्देश पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी दिले.

    दूरदृष्य प्रणालीद्वारे नमो पर्यटन सुविधा केंद्रासंदर्भात पालकमंत्री श्री. देसाई यांनी आढावा घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, जिल्हा नियोजन अधिकारी यशवंत थोरात उपस्थित होते.

    प्रतापगड किल्ल्याच्या पायथ्याशी महसूल व वन विभागाची जागा आहे, असे सांगून पालकमंत्री श्री. देसाई म्हणाले, महसूल विभागाची जागा कमी असल्यास वन विभागाची जागा लवकरात लवकर निश्चीत करावी व वन विभागाने केंद्राच्या बाधकामासाठी नाहकरत प्रमाणपत्र घ्यावे. जागा निश्चीत करण्यासाठी पर्यटन विभागाचे अधिकारी पाठविण्यात येतील. जागा निश्चित होताच कामाची निविदा काढली जाईल, असेही पालकमंत्री श्री. देसाई यांनी बैठकीत सांगितले.

No comments