फलटण येथे प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध चित्रकृतीचे उद्घाटन व लोकार्पण
![]() |
प्रतापगड किल्ला प्रतिकृतीची पाहणी करताना तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव व अन्य मान्यवर |
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ ऑक्टोबर २०२५ - श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळ, फलटणच्या माध्यमातून दिवाळीनिमित्त उभारण्यात आलेली प्रतापगड किल्ला प्रतिकृती व अफजलखान वध देखावा अत्यंत उत्तम रचना असून या किल्ल्याविषयी ऐतिहासिक माहिती देणारे फलक प्रेरणदायी असल्याचे प्रतिपादन तहसीलदार डॉ. अभिजित जाधव यांनी केले.
श्रीमंत एकता गणेशोत्सव मंडळाच्या या उपक्रमाचे उद्घाटन व लोकार्पण श्रीफळ वाढवून व फीत कापून तहसीलदार डॉ. अभिजीत जाधव यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी विशेष अतिथी म्हणून ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता, निवासी नायब तहसीलदार अभिजीत सोनवणे, फलटण तालुका मराठा क्रांती मोर्चा समन्वयक ज्ञानेश्वर तथा माऊली सावंत, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते दशरथ फुले, उद्योजक मंगेश दोशी, सामाजिक कार्यकर्ते नंदकुमार मोरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजाभाऊ निकम, राष्ट्रीय काँग्रेस अल्पसंख्यांक सेल तालुकाध्यक्ष ताजुद्दीन बागवान, शहराध्यक्ष अल्ताफ पठाण, मुंबई उच्च न्यायालयातील प्रख्यात वकील विश्वनाथ टाळकुटे, श्री विशाल पवार. प्रोग्रासिव इंग्लिश स्कूल चे सर्वेसर्वा .पत्रकार युवराज पवार, प्रशांत रणवरे, योगेश गंगतीरे उपस्थित होते.
प्रतापगड किल्ल्याची व त्यावरील तत्कालीन वास्तूंची उभारणी अत्यंत उत्तम पद्धतीने त्याचे ऐतिहासिक महत्व लक्षात घेऊन करण्यात आली आहे. त्याच्या शेजारच्या दालनात किल्ल्याची व तेथील ऐतिहासिक घटनांची माहिती चित्ररुप व लिखित स्वरुपात अत्यंत उदबोधक पध्दतीने देण्यात आली आहे, त्यामुळे हे संपूर्ण दालन पाहिल्यानंतर छ. शिवरायांचा हुबेहुब कालावधी व त्याचा पराक्रम समोर उभा ठाकत असल्याने सर्वांना एक नवी ऊर्जा या प्रकल्पातून लाभत असल्याचे दिसून येते.
या उपक्रमाचे निमंत्रक अमीरभाई शेख यांनी प्रारंभी सर्व उपस्थितांचे स्वागत केल्यानंतर प्रास्तविकात मंडळाच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमाविषयी माहिती दिली. त्यामाध्यमातून नवी पिढी मोबाईल पेक्षा अशा उपक्रमातून हिंदुस्थानचा प्रेरणादायी इतिहास, समाज सुधारक, समाज उद्धारक महापुरुषांच्या जीवन कार्याची, छ. शिवाजी महाराज, छ, संभाजी महाराज यांच्या कार्यकर्तृत्वाचा इतिहास समजावून घेतील त्यातून त्यांना प्रेरणा मिळेल हा मुख्य उद्देश असल्याचे आवर्जून सांगितले.
किल्ले संवर्धक संघटनेच्या यांनी प्रतापगड किल्ला व तेथील माहिती देणाऱ्या फलकांविषयी सविस्तर माहिती दिली.
यावेळी लायन्स, रोटरी या सामाजिक संस्थांचे पदाधिकारी, बिल्डर्स असोसिएशन व क्रेडाईचे पदाधिकारी, माळजाई कट्टा ग्रुपचे सदस्य उत्तम महामुलकर, राजाभाऊ देशमाने, मोहन जामदार, राहुल शहा, योगेश दोशी, बंडूशेठ कदम, शरद दीक्षित, बारवबाग मित्र मंडळाचे सन्माननीय सदस्य बळीप सर बंधू, संदीप कर्णे, आशिष जाधव, सचिन माने, मंडळाचे अध्यक्ष उपाध्यक्ष पदाधिकारी आणि परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
No comments