Breaking News

सातारा बँकेत संचालक असूनही आसू संस्था अडचणीत ; बँकेत काय वडापाव खायला जाताय का? - विशालसिंह माने

Despite being a director in Satara Bank, Aasu organization is in trouble; Why are you going to eat vada pav in the bank? - Vishal Singh Mane

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ ऑक्टोबर २०२५ - श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर तुम्ही महाराष्ट्रात न्हवे तर देशात प्रसिद्ध असलेल्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेत संचालक म्हणून काम करताय, अन आसू गावातील एक एक संस्था अडचणीत येत आहे, त्या संस्थेची जागा विकताय, मग जिल्ह्यातील अनेक संस्थांना आर्थिक मदत करून हजारो सोसायटी किंवा इतर संस्था अडचणीतून बाहेर पडून, संस्था आज नावारूपाला येत आहेत व तुम्ही मात्र संस्था अडचणीत/आवसायनात आणताय, मग एवढ्या मोठ्या संस्थेत संचालक म्हणून काम करताना मग तिथं काय फक्त वडापाव खायला जाताय का? असा जळजळीत प्रश्न विचारीत, आता तुम्ही केलेले सगळेच बाहेर निघत असून, तुम्हाला आता जिथून आलाय तिथं माघारी पाठवल्या शिवाय राहणार असा घणाघात, आसूचे भाजपचे युवानेते विशालसिंह माने पाटील यांनी केला.

    काळेश्वर दूध संस्थेच्या विकलेल्या जमिनीबाबत सर्व पुराव्याणीशी झालेल्या काळेश्वर मंदिरात झालेल्या पत्रकार परिषदेत विशालसिंह माने पाटील बोलत होते यावेळी  अजय फराटे, प्रमोद झांबरे, स्वामिनाथ साबळे, विठ्ठल माने, श्रीकांत शेडगे, सुभाष एतकाळे, राजेंद्र गोफणे,गोजाबा शेंडे, हणमंतराव खारतोडे, रमेश गोफने, संजय पवार, बाबुलाल शेख, नवनाथ कुंभार, धनंजय घोरपडे, नाथाजी गोफणे, धनंजय बोडरे यांचेसह अनेक ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

    यावेळी बोलताना विशालसिंह माने पाटील यांनी बोलताना सांगितले की, काळेश्वर दूध संस्था अडचणीत आली म्हणून ती आवसायनात निघेल त्यासाठी संस्थेची जागा विकली यामध्ये अनेक प्रश्न उपस्थित होत असून शिवरूपराजे तुम्ही दुसऱ्याच्या खांद्यावर बंदूक ठेऊन उत्तरे का देताय, तुमच्यात दम आहे तर समोरासमोर येऊन काळेश्वर मंदिरात या तिथंच काय खरं अन काय खोट ते करू पण तुमच्यात ती हिम्मत नाही, अजून तुम्हाला अनेक प्रश्नांची उत्तरे द्यायची आहेत आता फक्त विकलेल्या जमिनी बाबत बोलतोय परंतु येणाऱ्या काळात तुम्हाला खूप उत्तरे द्यायची आहेत. अहो तुम्ही कधी खिशातून 47 रुपयांची वर्गणी कधी दिली नाही, अन तुमचा चेला सांगतोय की 47 लाख रुपये परत करू, त्या चेल्याला सहकारातल काय कळतं? त्यांनी असे विशालसिंह माने पाटील यांनी सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे संचालक श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर शासकीय किमतीपेक्षा कमी रक्कमेचा दस्त केला, तुमच्या मुलाने संस्थेत सचिव म्हणून काम केले परंतु पगार घेतला नाही,ऑडिट रिपोर्ट मध्ये पगाराची देणेबाकी दाखवली आहे,त्याच संस्थेचे संचालक हा लिलाव घेतात जे वर्तमानपत्र गेली दीड ते दोन वर्षे झाली गावातच येत नाही, त्या वर्तमानपत्रात जाहीर निविदा देताय, ते कोणत्या वर्गात येते? ती जाहिरात तिघेच वाचतायत अन पाच पाच हजाराने फरकाची बोली लावतात,याचा अर्थ ग्रामस्थांना किंवा सभासदांना जाणूनबुजून अंधारात ठेवताय, घेणाऱ्या व्यक्तीला पत्रकार परिषदेत विचारताय की जागा माघारी देणार का, तो म्हणतोय पैशे वाढवून आले पाहिजेत, तो तुमच्या घरी गेली अनेक वर्षे दिवाणजी म्हणून काम करतोय,हे सर्वांना माहित असून, शिवरूपराजे तुम्ही आत्तापर्यंत अनेक संस्था व सर्वसामान्य लोकांना लुबाडले असून तुमचा आता घडा भरलाय, ती जागा संस्थेला परत दिली नाही तर तुम्हांला जिथून आला आहात तिथं परत पाठवण्याची तयारी आता आम्ही केली आहे असा घणाघात आसूचे भाजपचे युवानेते विशालसिंह माने पाटील यांनी श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांच्यावर हल्ला चढवीला.

No comments