प्रभाग ३ मधून पूनम भोसले यांच्या उमेदवारीची चर्चा ; शक्ती भोसले यांच्या चुलती
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१९ ऑक्टोबर २०२५ - फलटण नगर परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्र. ३ मधून पूनम सुनिल भोसले यांना राजेगटा कडून उमेदवारी मिळेल असे त्यांच्या समर्थकांकडून बोलले जात आहे. त्या सुप्रसिद्ध क्रिकेटपट्टू व राजे समर्थक युवा नेतृत्व पत्रकार शक्ती उर्फ अशोक भोसले यांच्या चुलती असून, भोसले परिवाराचा राजकीय वारसा आणि सामाजिक योगदान या दोन्हींची छाप त्यांच्या उमेदवारीवर उमटली आहे.
पूनम भोसले या गेल्या अनेक वर्षांपासून रामराजे समर्थक म्हणून कार्यरत आहेत. शक्ती भोसले यांच्या माध्यमातून त्यांनी महिलांसाठी, गरीब विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत, तसेच परिसरातील मूलभूत सुविधांसाठी केलेले सातत्यपूर्ण प्रयत्न यामुळे त्यांचा प्रभागात चांगला जनसंपर्क तयार झाला आहे.
अलीकडेच वाढदिवसाच्या निमित्ताने चर्चेत आलेले शक्ती भोसले हे युवकांचे प्रेरणास्थान मानले जातात, आणि त्यांच्या सामाजिक कार्यशैलीचा प्रभाव पूनम भोसले यांच्या कार्यातही दिसून येतो. यांच्या कुटुंबाने फलटण शहरात नेहमीच सामाजिक आणि राजकीय योगदान दिले आहे. युवकांच्या अडीअडचणीला सातत्याने धावून जाणारे शक्ति भोसले हे आपल्या प्रभागातील मूलभूत सुविधांकरिता सातत्याने अग्रेसर भूमिका घेतात.
पूनम भोसले यांच्या उमेदवारीने प्रभाग ३ मधील राजकीय समीकरणांमध्ये नवीन चैतन्य आले असून, विरोधकांच्या गोटात खळबळ माजल्याचे बोलले जाते. सामाजिक कार्यातून राजकीय नेतृत्वाकडे वाटचाल करणाऱ्या या कार्यकर्तीवर पक्षाचा विश्वास हे महिलांच्या राजकारणातील वाढत्या सहभागाचे उदाहरण मानले जात आहे.
विधान परिषदेचे माजी सभापती आमदार श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या कार्यशैलीवर श्रद्धा ठेवून शक्ती भोसले व पूनम भोसले यांनी पक्षाच्या कार्यक्रमांत सक्रिय सहभाग घेतला आहे. त्यांच्या उमेदवारीने प्रभाग क्र. ३ मधील निवडणुकीत उत्सुकता वाढली असून, नागरिकांमध्ये “सामाजिक कार्यातून नेतृत्वाकडे” असा नवा संदेश त्यांच्या माध्यमातून जात आहे.
राजे गटातील वरिष्ठ नेतेही त्यांच्या कामाची दखल घेत उमेदवारी देऊन महिलांना राजकारणात नवा वाव देतील असे बोलले जात आहे. फलटण नगरपालिकेतील प्रभाग ३ आता एका अनुभवी, ऊर्जावान आणि जनसंपर्कशील महिला नेतृत्वाकडे पाहत आहे.
No comments