Breaking News

गावठी पिस्टल बाळगणाऱ्या इसमास अटक ; सातारा शहर डी.बी.पथक कारवाई

Villager arrested for carrying pistol; Satara city DB squad takes action

    सातारा दिनांक ८ (प्रतिनिधी) - सातारा शहरांमध्ये पेट्रोलिंग करत असताना एमआयडीसी परिसरात अवैधरित्या गावठी पिस्टल बाळगणाऱ्या नासीर अब्दुलकरीम बागवान वय ४९, रा.सोमवार पेठ सातारा याला अटक केली असून त्याच्याकडून गावठी पिस्टलासह तीन जिवंत राऊंड, मोबाईल असा 65 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आल्याची माहिती सातारा शहर पोलिसांनी दिली. ही कारवाई सातारा शहर डी.बी.पथकामार्फत करण्यात आली.

    सातारा पोलीस अधीक्षक तुषार दोशी, सातारा शहर पोलीस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मस्के यांनी सातारा शहरामध्ये अवैधरित्या अग्निशस्त्र बाळगणारे इसमांचा शोध घेवून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्याबाबत सातारा शहर डी. बी. पथकास सुचना दिलेल्या होत्या.

    त्याप्रमाणे सातारा शहर पोलीस ठाणेचे डी.बी. पथक पोलीस ठाणे हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गोपनीय बातमीदारामार्फत एक इसम एम. आय. डी. सी. परिसरामध्ये अवैध गावठी पिस्टल विक्री करण्यासाठी येणार असलेबाबत खात्रीशीर माहिती प्राप्त झाल्यावर डी. बी.पथकाने दोन पथके केली. मिळालेल्या माहितीमधील संशयित इसम हा एम. आय. डी. सी परिसरात दत्तनगर कॅनॉल येथे एक पिशवी घेऊन संशयितरित्या फिरत असताना दिसून आल्यावर त्यास पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांची पिशवी मध्ये काय आहे याची पाहणी केली असताना एका छोट्या बॉक्समध्ये एक गावठी पिस्टल व जिवंत ३ राऊंड आढळल्यानंतर ते जप्त करण्यात आले. सदरचे पिस्टल हे विक्री करण्याच्या उद्देशाने बाळगले असल्याचे आरोपीने सांगितले.

    सदरची कारवाई गुन्हे प्रकटीकरण पथकाचे पोलीस उपनिरीक्षक सुधीर मोरे, पो.हवा.सुजीत भोसले, निलेश यादव, निलेश जाधव, विक्रम माने, प्रविण कडव, पो.ना.पंकज मोहिते, पो.कॉ.संतोष घाडगे, तुषार भोसले, सचिन रिटे, सागर गायकवाड, मच्छिंद्रनाथ माने, आशिकेष डोळस, वैभव माने, सुशांत कदम, सुहास कदम यांनी सहभाग घेतला.

No comments