मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर रणजितसिंह नाईक निंबाळकर व आ. सचिन पाटलांचा आढावा दौरा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२३ ऑक्टोबर २०२५ - दिनांक २६ ऑक्टोबर २०२५ रोजी आपल्या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस फलटणला येत आहेत, त्या अनुषंगाने, माजी खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर व आमदार सचिन पाटील यांनी जिल्हा परिषद गट निहाय आढावा दौरा व बैठका घेतल्या असून, येत्या दोन दिवसात फलटण शहरात आढावा बैठका घेणार आहेत.
आढावा दौरा व बैठकांचे नियोजन पुढीलप्रमाणे आहे. दि.२४ ऑक्टोबर २०२५ रोजी दुपारी ३ वाजता फलटण शहर प्रभाग क्र.१ - सं.४.०० वाजता महादेव मंदिर (सोमवार पेठ), प्रभाग क्र.२ व ३ - सं. ५.०० डॉ. बाबासाहेब आंबेडकर (सभागृह मंगळवार पेठ), प्रभाग क्र.४ - सं.६.०० वाजता भैरवनाथ मंदिर, भैरोबा गल्ली, प्रभाग क्र.५ - सं.७.०० स्वामी मंदिर, मलठण, प्रभाग क्र.६ - सं.८.०० अभिनव चौक, मलठण, प्रभाग क्र.७ - सं.९.०० वाजता भोसले वाडा, चिंचेच्या झाडाखाली
दि. २५ ऑक्टोबर २०२५ - फलटण शहर प्रभाग क्र.८ व ११ स.१०.०० वा नवलबाई मंगल कार्यालय, प्र.क्र.९ - स.११.०० वा खंडोबा मंदिर, नरसिंह चौक, प्र.क्र.१० - दु. १२.०० वा जलमंदिर, प्र.क्र.१२ - दु. १.०० वा नवलबाई मंगल कार्यालय, प्र.क्र.१३ - दु. २.०० वा गणपती मंदिर,आर्यमान हॉटेल शेजारी.
तरी उपरोक्त प्रमाणे नगर पालिका प्रभागातील सर्व महायुती पदाधिकारी, कार्यकर्ते यांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.

No comments