प्रभाग क्रमांक १२ मध्ये विकास काकडे सर यांना जनतेचा पाठिंबा
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑक्टोबर २०२५ - फलटण नगरपरिषद निवडणुकीचे पडघम वाजू लागले असून प्रभाग क्रमांक १२ मध्ये विशेष लक्ष वेधून घेतले जात आहे. विविध राजकीय गटांमधून इच्छुक उमेदवारांची चर्चा सुरू असताना, जनतेतूनच एक नावलौकिक प्राप्त व्यक्तिमत्त्व म्हणून विकास वसंतराव काकडे सर यांचे नाव पुढे येत आहे.
विकास काकडे सर हे राजे गटाचे निष्ठावान व विश्वासू कार्यकर्ते मानले जातात. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी अनेक उपक्रम राबवले असून, साहस क्रीडा मंडळाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी महापुरुष जयंती, रक्तदान शिबीर, श्रामणेर शिबीर, मोफत पाठ्यपुस्तक वाटप, तसेच गरीब व गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत पुरविण्याचे कार्य सातत्याने केले आहे.
कोविडच्या संकटमय काळात सरांनी शाळकरी मुलांसाठी शिधा वाटप, आर्थिक मदत, तसेच ताथवडा आश्रमशाळा व वृद्धाश्रमातील नागरिकांची मदत करून सामाजिक भान जपले. अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक जिल्हा दक्षता समितीचे सदस्य म्हणून त्यांनी अनेकांना मदत केली आहे.
विकास काकडे सर हे श्रीमंत मालोजीराजे शेती विद्यालयाचे माजी उपप्राचार्य असून, मुधोजी हायस्कूलमध्ये त्यांनी दीर्घकाळ सेवा दिली. तसेच, शिक्षक पतसंस्था व सहकारी संस्थांमध्ये ते व्हाइस चेअरमन म्हणून कार्यरत होते. सातारा सहकार बोर्डाचे ते माजी संचालक आहेत.
हिंदी राष्ट्रभाषा प्रचारक म्हणून त्यांना पुणे हिंदी प्रचारक संस्थेचा पुरस्कार प्राप्त झाला आहे. शिक्षक, प्राध्यापक व विद्यार्थ्यांच्या संयुक्त समितीच्या माध्यमातून 1991 मध्ये फलटण येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व महात्मा फुले स्मृती शताब्दी व्याख्यानमाला आयोजित करून त्यांनी सामाजिक विचारधारेची मुहूर्तमेढ रोवली.
श्रीमंत रामराजे, श्रीमंत रघुनाथराजे आणि श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्याशी त्यांचे घनिष्ठ व विश्वासाचं नातं असून, राजे गटाचे खंदे कार्यकर्ते म्हणून त्यांची ओळख आहे. अनेक वर्षांपासून ते सामाजिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे नेतृत्व करत आले आहेत.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर व तथागत गौतम बुद्ध जयंती महोत्सवाच्या माध्यमातून त्यांनी दलित व बहुजन समाजातील युवकांमध्ये जागरूकता निर्माण केली आहे. त्यांच्या नेतृत्वात स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजीराजे यांची प्रतिमा मिरवणूक काढण्याच्या मान विकास काकडे सर यांच्या नेतृत्वाखाली भगवान गौतम बुद्ध जयंती महोत्सव समितीला मिळाला . तसेच जयंती मिरवणुका, सामाजिक विचारधारा रुजवण्यासाठी विविध उपक्रम यशस्वीरित्या पार पाडले गेले.
प्रभाग क्रमांक १२ मधील नागरिकांमध्ये विकास काकडे सरांविषयी दांडगा जनसंपर्क, विश्वास व आदर आहे. त्यांच्या सामाजिक जाणिवा, तळागाळातील लोकांसाठी केलेले कार्य आणि सर्वसमावेशक दृष्टिकोन लक्षात घेता, त्यांना उमेदवारी मिळावी अशी जनतेतून व कार्यकर्त्यांतून जोरदार मागणी होत आहे.
No comments