Breaking News

फलटणमध्ये जीएसटी बिल देण्यासाठी व्यापाऱ्याने केली आगाऊ रक्कमेची मागणी

Trader demands advance payment to pay GST bill in Phaltan

    फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२० ऑक्टोबर २०२५ - ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा फलटण मधील एका व्यापाऱ्याने सुरु केला असून, पाईपची मागणी केली असता, अगोदर एक किंमत सांगितली अन नंतर ऑनलाईन पैसे देतो असे शेतकरी म्हणताच, त्याला वाढीव किंमत द्यावी लागेल, असा दम भरीत शासनाच्या नियमानुसार जीएसटी बिल मागितले असता, त्या शेतकऱ्याला उर्मट भाषेत बोलण्याचा निंदनीय प्रकार फलटण मध्ये घडला असून अशा मस्तवाल व्यापाऱ्यांचा नांगा जिरवावा अन त्याच्या संपूर्ण दुकानाची जीएसटी विभागाने आर्थिक तपासणी करून जीएसटी सह परवाना रद्द करावा अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

    या बाबत अधिक माहिती अशी की, फलटण तालुक्यात मे महिन्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले असून, त्याची तुटपुंजी मदत शासनाने केली, त्यात ना शेतकऱ्यांना दिलासा मिळाला ना त्यातून  शेतकरी उभा राहिला.  बँका सोसायटी किंवा पतसंस्था यांची कर्ज काढून आर्थिक संकटातून बाहेर पडताना, अक्षरशः कोलमडून गेला असताना, त्याच शेतकऱ्यांना लुटण्याचा धंदा हे व्यापारी करीत असून, त्यांना कोण आवरणार? असा यक्ष प्रश्न फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांना पडला आहे, एकतर अगोदरच हे व्यापारी लोकल कंपन्याचे निकृष्ठ दर्जाचे साहित्य शेतकऱ्यांना विकत असून त्याच्या भरमसाठ किमती लावल्या जात असून शेतकऱ्यांना दिवसाढवळ्या लुटण्याचा एक कलमी कार्यक्रम करीत आहेत,तर केंद्र व राज्य सरकारने लागू केलेले जीएसटी(केंद्राचा व राज्याचा) हे व्यापारी कमी भरून घडगंज होत आहेत व शासनासह शेतकऱ्यांना चुना लावित असून अशा मुजोर व्यापाऱ्यांचा जीएसटी परवाना व विक्री परवाना रद्द करावा अशी जोरदार मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

No comments