मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार शेकडो कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ व लोकार्पण - रणजितसिंह नाईक निंबाळकर
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ ऑक्टोबर २०२५ - महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री ना. देवेंद्र फडवणीस यांच्या हस्ते फलटण शहर आणि तालुक्यातील शेकडो कोटींच्या विविध विकास कामांचे लोकार्पण , उदघाटन आणि भूमीपुजन समारंभाचे आयोजन रविवार दि. २६ ऑक्टोबर२०२५ रोजी सकाळी १० वाजता ऑनलाईन व प्रत्यक्ष पद्धतीने होणार असल्याची माहीती माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी दिली.
दि.२६ रोजी ऑनलाईन पध्दतीने होणारे कार्यारंभ, भूमिपूजन व लोकार्पण पुढीलप्रमाणे आहेत. नीरा देवघर प्रकल्प उजवा मुख्य कालवा टप्पा २ किमी ८७ ते १३४ पर्यंत बंदिस्त नलिका वितरण प्रणालीचे काम करणे निविदा किंमत ९६७ कोटी लाभ क्षेत्र १२३१४ हे (फलटण तालुका) या कामाचा कार्यारंभ.
प्रशासकीय भवन या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन तथा कार्यारंभ सोहळा रू. १८,६९,००,०००/- किमतीच्या इमारतीचे कामाचा शुभारंभ.
महसूल भवन या नवीन इमारतीच्या कामाचा भूमिपूजन तथा कार्यारंभ सोहळा रू. ०९,७५,००,०००/- किमतीच्या इमारतीचे कामाचा शुभारंभ.
फलटण शहरांतर्गत होणारा नवीन कॉक्रिट पालखी मार्ग रू. ७५,००,००,०००/- कामाचा कार्यारंभ.
फलटण दहिवडी राष्ट्रीय महामार्ग -१६० या ४० कि. मी. लांबीचा चौपदरीकरण, कॉक्रिटीकरण करावयाचे असलेल्या रक्कम रु. ५३४,००,००,०००/- किमतीच्या मंजूर रस्त्याचा कार्यारंभ.
प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत मंजूर असणाऱ्या २० कोटी निधीचा ३ रस्त्याच्या कामाचा कार्यारंभ. आसू-फलटण-गिरवी या एम.एस.आय.डी.सी. योजनेतून सुरू असणाऱ्या एकूण ५० कि. मी. लांबीच्या व रक्कम रू. १९८,००,००,०००/- किमतीच्या कॉक्रिट रस्त्याच्या कामा पैकी फलटण ते गिरवी या पूर्णपणे बांधून झालेल्या रस्त्याचे लोकार्पण.
प्रत्यक्ष होणाऱ्या कामाचा कार्यारंभ, भूमिपूजन तथा लोकार्पण पुढीलप्रमाणे आहेत.
फलटण शहर व फलटण ग्रामीण पोलीस स्टेशनच्या नूतन इमारत प्रत्येकी रू. १२,२८,३६,९३२/- किंमत असलेल्या व ९५०० स्क्वेअर फुट जागेत बांधण्यात आलेल्या नवीन इमारतींचा व ८७ पोलीस कर्मचारी निवास रक्कम रू. २७,११,४८,६७७/- किंमत असणाऱ्या व ८०,००० स्क्वेअर फुट क्षेत्रात बांधण्यात आलेल्या इमारतींचा लोकार्पण सोहळा. तसेच वाठार स्टेशन येथेही बांधण्यात आलेल्या नवीन पोलीस स्टेशन इमारत किंमत रक्कम रू. १२,२८,३६,९३२/- या इमारतीचे ऑनलाईन लोकार्पण.
या बरोबरच फलटण तालुक्यातील शेतकरी तरुण मित्र, श्रमिक कामगार, बांधकाम कामगार, महिला बचत गट महिला यांचा भव्य मेळावा आपल्या उपस्थितित पार पडणार आहे. या मेळाव्यात ऑनलाईन विकास कामांची उद्घाटने, कार्यारंभ, लोकार्पण सोहळा पार पडेल व या मेळाव्यात फलटण तालुक्यातील जनतेस आपले बहुमूल्य मार्गदर्शन असे कार्यक्रमाचे स्वरूप असेल.

No comments