पोलीस उपनिरीक्षक बदने व प्रशांत बनकर यांच्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल ; आरोपी फरार - शोधासाठी पथके रवाना
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.२४ - फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असलेल्या डॉ. संपदा मुंडे यांनी काल रात्री त्रासाला कंटाळून आत्महत्या केली होती. आत्महत्ये प्रकरणी पोलीस उपनिरीक्षक गोपाल बदने आणि प्रशांत बनकर हे माझ्या मृत्यूला जबाबदार असल्याची सुसाईड नोट मुंडे यांनी हातावर लिहली होती. त्याअनुषंगाने आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फलटण शहर पोलीस ठाण्याकडून मिळालेल्या माहितीनुसार, उपजिल्हा रुग्णालय फलटण येथे कार्यरत असणाऱ्या महिला वैदयकिय अधिकारी यांनी दि.२३/१०/२०२५ रोजी पहाटे ०१.३० ते सायं ०७.१५ वा. दरम्यान मधुदीप हॉटेल फलटण येथील रूममध्ये स्वतःच्या डाव्या हाताच्या तळहातावर, बॉलपेनाने मरणाचे कारण, पोलीस उपनिरीक्षक बदने यांनी लैंगिक अत्याचार केला व प्रशांत बनकर याने शारिरीक व मानसिक छळ केला असा मजुकर लिहून त्यांनी स्वतःच्या ओढणीच्या सहाय्याने सिलींग फॅनला गळफास घेवून आत्महत्या केली आहे.
मयत वैदयकीय अधिकारी यांचे चुलत भाऊ प्रमोद धनराज मुंडे यांनी फलटण शहर पोलीस ठाणेस, नमूद आरोपींच्या विरुद्ध बलात्काराचा व आत्महत्तेस प्रवृत्त केल्याबाबत गुन्हा नों.क्र.३४५/२०२५ कलम ६४(२) (एन), १०८ भा.न्या. संहिता प्रमाणे गुन्हा दाखल केला असून, सदर गुन्हयातील आरोपींचा शोध घेणेकामी पथके रवाना केली आहेत. यातील आरोपी गोपाल बदने, पोलीस उपनिरीक्षक, फलटण ग्रामीण पोलीस ठाणे यांना निलंबित करणेत आले आहे.
सदर गुन्हयाचा तपास श्री अरविंद काळे, पोलीस निरीक्षक, फलटण शहर पोलीस ठाणे हे करीत आहेत.
%20(1).jpeg)
No comments