शिवरूपराजे खर्डेकर यांनी दूध संस्थेची जमीन परस्पर विकून संस्थेचे लाखो रुपयांचे नुकसान केले.
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.९ ऑक्टोबर - सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका अध्यक्ष श्रीमंत शिवरूपराजे खर्डेकर यांनी आसू येथील काळेश्वर दूध सहकारी संस्थेची जमीन कवडीमोल किंमतीला परस्पर विकून, संस्थेचे आर्थिक नुकसान केले, तसेच त्या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष असल्यामुळे त्यांनी स्वतःच्या मुलाला त्या संस्थेचे सचिव म्हणून नोकरीस दाखविले असून, झालेल्या व्यवहाराची चौकशी करावी अशी मागणी विशालसिंह माने पाटील यांचेसह इतर ग्रामस्थांनी केली आहे.
आसू ता. फलटण येथील काळेश्वर दूध सहकारी संस्थेची स्थापना झाली तेव्हा श्रीमंत शिवरूपराजे यांचं वय कमी होते, तेव्हा ते कसे संस्थापक होऊ शकतात असा प्रश्न विचारीत खर्डेकरांनी आपल्या पदाचा गैरवापर करीत, संस्थेची असलेली जमीन कवडीमोल दराने विकली, त्यावेळी ती विकताना इतर संचालक किंवा सभासदांना विश्वासात घेतले नाही, त्याचबरोबर त्यांनी संस्थेत आपले चिरंजीव श्रीमंत धीरेंद्रराजे यांना सेवक वर्ग म्हणजेच सचिव दाखवून हजारो रुपये पगार काढला आहे असे ही विशालसिंह माने पाटील यांनी निदर्शनास आणून देत, श्रीमंत शिवरुपराजे खर्डेकर यांच्यावर गंभीर आरोप केले. यावेळी जेष्ठ नेते राजनभाऊ फराटे, हरिशन्द्र पवार,विठ्ठल माने, श्रीराम सहकारी साखर कारखान्याचे संचालक स्वामिनाथन साबळे, अजय फराटे, प्रमोद झांबरे, आबा शेडगे, धनंजय बोडरे, धनंजय घोरपडे,आनंदराव माने, रमेश गोफने,राजेंद्र गोफने,यांचेसह इतर आजी माजी संचालक ग्रामस्थ व सभासद उपस्थित होते.
No comments