कामगार संघर्ष संघटनेचा निवडणुकीत उतरायचा निर्णय
फलटण (गंधवार्ता वृत्तसेवा) दि.१७ - कामगार संघर्ष संघटना आगामी होणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ताकदीने उमेदवार उभा करणार असल्याची घोषणा कामगार संघर्ष संघटनेचे सातारा जिल्हा युथ अध्यक्ष सुरजभाऊ भैलुमे यांनी केली आहे.
भैलुमे यांनी सांगितले की, “कामगार संघर्ष संघटना नेहमी सर्व समाजाच्या हितासाठी लढत असते. नागरिकांना शिक्षण, रोजगार, आरोग्य, वीज, पाणी अशा मूलभूत सुविधा मिळवून देण्यासाठी आमचे पदाधिकारी रात्रंदिवस कार्यरत आहेत. आता सत्तेत जाऊन समाजाच्या हितासाठी थेट लढण्याची वेळ आली आहे.”
फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 1, 2, 3, 5, 7 आणि 10 मध्ये संघटनेचे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. मतदारांना आवाहन करताना भैलुमे म्हणाले, “मतदार मायबाप नक्कीच आमच्यावर विश्वास ठेवतील आणि आम्हाला लढण्याची ऊर्जा देतील. नागरिकांच्या प्रश्नांसाठी आणि त्यांच्या हक्कासाठी कामगार संघर्ष संघटना सदैव तुमच्या पाठीशी आहे.”
No comments